शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात साधना सहकारी बँकेची साईट हॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 14:03 IST

साधना सहकारी बँकेची साईट हॅक करून सायबर गुन्हेगारांनी बँकेचे ५ लाख, ६० हजार रुपये वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर केले.

ठळक मुद्देसायबर गुन्हेगारांनी केले साडेपाच लाख लंपास : जरीपटक्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साधना सहकारी बँकेची साईट हॅक करून सायबर गुन्हेगारांनी बँकेचे ५ लाख, ६० हजार रुपये वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर केले. शुक्रवारी दुपारी १२. २० वाजता ही बाब उघड झाल्यानंतर बँक प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली. वेळीच बँक अधिका-यांनी आवश्यक उपाययोजना केल्याने मोठी रक्कम वाचली. दरम्यान, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पोपटलाल देसाई (वय ५२) यांनी जरीपटका पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे.साधना सहकारी बँकेचे मुख्यालय जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी १२. २० वाजता सायबर गुन्हेगाराने बँकेची साईट हॅक करून डाटा चोरला. त्यानंतर बँकेचे लॉगिन आणि पासवर्डचा गैरवापर करून अवघ्या काही मिनिटात ५ लाख, ६० हजार रुपये वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर करून घेतले.दरम्यान, बँकेची साईट हॅक झाल्याचे आणि सायबर गुन्हेगार बँक खात्यातील रक्कम दुसरीकडे वळती करत असल्याचे लक्षात आल्याने बँकेच्या अधिका-यांनी लगेच आवश्यक उपाययोजना करीत रक्कम फ्रीज केली. त्यानंतर जरीपटका पोलिसांसोबत संपर्क साधला. सायबर शाखेच्या अधिका-यांनाही सूचित केले. पोलिसांनी कलम ३७९, ४२० भादंवि तसेच माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे सहकलम ६६ (ब, क, ड)अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.बँकींग वर्तुळात खळबळसाधना सहकारी बँकेची साईट हॅक करून रक्कम लंपास केल्याच्या वृत्ताने बँकिंग वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. यापूर्वी अशाच प्रकारे नागपुरात मुख्यालय असलेल्या एका खासगी बँकेची रक्कम सायबर गुन्हेगारांनी वळती केली होती. तर, पुण्यातीलही एका बँकेचे ९४ कोटी रुपये अशाच पद्धतीने सायबर गुन्हेगारांनी हडप केले आहे. त्या गुन्हेगारांचा अद्यापही शोध लागलेला नाही, हे विशेष !

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमbankबँक