शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

नागपूर महापालिका आयुक्तांच्या अर्थसंकल्पापूर्वी फाईल मंजुरीसाठी धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 14:40 IST

महापालिका आयुक्त पुढील आठवड्यात सन २०१७-१८ या वर्षाचा सुधारित व २०१८-१९ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर करणार आहेत. उत्पन्नाचे स्रोत विचारात घेता, स्थायी समितीच्या अर्थसंकल्पाला ३५ ते ४० टक्के कात्री लागण्याची शक्यता आहे. उपलब्ध निधी व प्राधान्यक्रमानुसार विकास कामांसाठी निधी उपलब्ध होणार आहे. याचा विचार करता आयुक्तांच्याअर्थसंकल्पापूर्वी फाईल मंजुरीसाठी नगरसेवक व पदाधिका ऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे.

ठळक मुद्देस्थायी समितीच्या अर्थसंकल्पाला लागणार कात्री : नगरसेवकांची चिंता वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका आयुक्त पुढील आठवड्यात सन २०१७-१८ या वर्षाचा सुधारित व २०१८-१९ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर करणार आहेत. उत्पन्नाचे स्रोत विचारात घेता, स्थायी समितीच्या अर्थसंकल्पाला ३५ ते ४० टक्के कात्री लागण्याची शक्यता आहे. उपलब्ध निधी व प्राधान्यक्रमानुसार विकास कामांसाठी निधी उपलब्ध होणार आहे. याचा विचार करता आयुक्तांच्याअर्थसंकल्पापूर्वी फाईल मंजुरीसाठी नगरसेवक व पदाधिका ऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे.नगरसेवकांनी सादर केलेल्या प्रभागातील विकास कामांच्या अनेक फाईल्स प्रशासकीय मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. आयुक्तांच्या अर्थसंकल्पानंतर नगरसेवकांच्या फाईल्स मंजूर होण्याची शक्यता कमी असल्याने, फाईल मंजुरीसाठी त्यांची धावपळ सुरू आहे.स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी २०१७-१८ या वर्षाचा २२७१.९७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. यात १०६५ कोटी जीएसटी अनुदान स्वरूपात मिळतील, अशी अपेक्षा होती. परंतु महापालिकेला जीएसटी अनुदान स्वरूपात दर महिन्याला ५१ ते ५२ कोटी मिळत आहे. वर्षाला हा आकडा ६५० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता नाही. मालमत्ता करापासून ३९२.१९ कोटी अपेक्षित होते. परंतु सायबरटेक कंपनीच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे हा आकडा २०० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता नाही. पाणीपट्टीतून १७० अपेक्षित होते, परंतु या विभागाची वसुली १५० कोटींच्या पुढे जाणार नाही. तसेच नगर रचना विभागाचे उत्पन्न ७५ कोटींच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. या विभागाला १०१ कोटींचे उद्दिष्ट दिले होते, म्हणजेच अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत ६५० कोटींची तूट राहणार आहे. वास्तविक उत्पन्नाचा विचार करता, आयुक्तांचा सुधारित अर्थसंकल्प १५०० ते १६०० कोटींचा राहणार असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत वित्त वर्षाच्या उत्पन्नात फारशी वाढ होण्याची शक्यता नसतानाच सिमेंट रोड, अमृत योजनेसाठी महापालिके ला आपल्या वाट्याचा निधी द्यावयाचा आहे. यामुळे नगरसेवकांना प्रभागातील विकास कामांसाठी भटकंती करावी लागत आहे. मात्र काही ज्येष्ठ नगरसेवकांना याची पूर्वकल्पना असल्याने त्यांनी आधीच मंजुरी घेऊ न कामाला सुरुवातही केली आहे.सायबरटेकच्या चुकीच्या सर्वेचा फटकामहापालिके चा वित्त व लेखा विभाग सुधारित अर्थसंकल्प तयार करण्याच्या कामाला लागला आहे. आयुक्तांच्या मंजुरीनंतर याला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. आठवडाभरात हे काम पूर्ण होणार आहे. मालमत्ता कराची वसुली व्हावी, यासाठी झोनस्तरावर स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव आणि कर आकारणी व कर संकलन समितीचे सभापती अविनाश ठाकरे यांनी आढावा बैठकी घेतल्या. झोनच्या सहायक आयुक्तांना कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश दिले. परंतु सायबरटेक कंपनीने चुकीचे सर्वेक्षण केले आहे. त्रुटी दूर करण्यासाठी बराच अवधी लागणार असल्याने याचा वसुलीवर परिणाम होणार आहे. यामुळे कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता नाही.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBudgetअर्थसंकल्प