शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण पोलिसांचे संकेतस्थळ ‘नो अपडेट’

By admin | Updated: August 12, 2014 01:13 IST

मोठा गाजावाजा करून नागपूर ग्रामीण पोलिसांनी ‘वेबसाईट’ सुरू केली. सुमारे सात महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या या वेबसाईटमध्ये वेळोवेळी ‘अपडेट’ करण्यात आले नाही. तसेच ज्या कामासाठी ही वेबसाईट

चुकीचा नामोल्लेख : सात महिन्यांपासून फारशा सुधारणा नाहीगणेश खवसे - नागपूरमोठा गाजावाजा करून नागपूर ग्रामीण पोलिसांनी ‘वेबसाईट’ सुरू केली. सुमारे सात महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या या वेबसाईटमध्ये वेळोवेळी ‘अपडेट’ करण्यात आले नाही. तसेच ज्या कामासाठी ही वेबसाईट उपयोगात येईल, असे सांगितले होते, ते कार्य अद्यापही सुरू झालेले नाही. परिणामी नागपूर ग्रामीण पोलिसांचे काम आजही ‘आॅफलाईन’च सुरू आहे. नागपूर शहर पोलिसांप्रमाणेच अत्याधुनिक आणि पोलिसांविषयी माहिती देण्याच्या उद्देशाने २७ जानेवारी २०१४ रोजी एका छोटेखानी कार्यक्रमात तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्या हस्ते ‘नागपूर पोलीस डॉट ओआरजी’ या वेबसाईटचे लोकार्पण करण्यात आले. या वेबसाईटवर पोलिसांशी संबंधित सर्वच माहिती मिळणार असून, थेट पोलीस अधीक्षकांशी ‘कनेक्ट’ होता येईल, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. पोलीस दैनिक वार्तापत्र (प्रेस नोट), जवळचे पोलीस ठाणे, पोलीस ठाणे आणि ठाणेदार, पोलीस ठाण्याचे छायाचित्र, महत्त्वाच्या लिंक, पदभरती, विशेष एकके (स्पेशल युनिट), नागपूर परिक्षेत्रातील पोलीस ठाण्यांचे दूरध्वनी क्रमांक, पोलिसांशी संबंधित कायदे आदी महत्त्वाच्या बाबींचा यात समावेश करण्यात आल्याचेही नमूद केले होते. यापैकी पोलीस ठाणे, नागपूर परिक्षेत्रातील पोलीस ठाण्यांचे दूरध्वनी क्रमांक, पोलिसांशी संबंधित कायदे, महत्त्वाच्या लिंक, सायबर सेफ्टी, मिशन, जबाबदाऱ्या यासह इतर काही अपडेट करण्यात आले. मात्र वेळोवेळी इतर बदल करण्यात न आल्याने या संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांची फसगत होते. या वेबसाईटवर पदक्रम (हायरार्की) हा ३२ अधिकाऱ्यांचा देण्यात आला आहे. त्यातील केवळ १३ अधिकारी सध्या त्या पदावर कार्यरत आहे. १९ अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. त्यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी वसंत शिरभाते, संतोष वानखेडे, मोक्षदा पाटील, सूर्यभान इंगळे यांच्यासह कामठीचे ठाणेदार विकास वाघ, कन्हानच्या सुनीता मेश्राम, मौद्याचे एम. के. तायडे, खापरखेड्याचे सय्यद इकबाल, रामटेकचे किशोर गवई, पारशिवनीचे विवेक जीवने, देवलापारचे हृदयनारायण यादव, अरोलीचे भोयर, उमरेडचे सुरेश भोयर, कुहीचे प्रकाश हाके, भिवापूरचे रमाकांत दुर्गे, सावनेरचे अशोक जांभळे, कळमेश्वरचे संभाजी मेहेत्रे, खाप्याचे डहाळे या ठाणेदारांची इतरत्र बदली झाली आहे. त्यास दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला असला तरी नागपूर ग्रामीण पोलिसांच्या ‘वेबसाईट’वर तेच ठाणेदार म्हणून कार्यरत दर्शविले आहे. एवढेच काय तर सध्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक प्रकाश जाधव हे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून ‘जैसे थे’ असून त्यांचे छायाचित्रही कायम आहे.मराठीने उडविला गोंधळही वेबसाईट इंग्रजीव्यतिरिक्त बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, स्वाहिली, तामीळ, तेलगू आणि उर्दू या भाषांमध्ये पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र मराठीत ही वेबसाईट पाहताना अनेक हास्यापद प्रकार समोर येतात. ‘लोकेट युवर पोलीस स्टेशन’चे ‘आपले पोलीस स्टेशनचे स्थानबद्ध’ असा थेट अनुवाद करण्यात आले. त्यासोबतच पदक्रम (हायरार्की)मध्ये नाव इंग्रजीत, आडनाव मराठीत; नाव मराठीत, आडनाव इंग्रजीत केले गेले असून कुहीचे ठाणेदार प्रकाश हाके (तत्कालीन) आणि केळवदचे आर. टी. चव्हाण यांच्या नावाचे भाषांतर करताना हा हास्यास्पद प्रकार नेमका लक्षात येतो. हाके यांचा नामोल्लेख ‘श्री प्रकाश मासे वाळविण्याची लाकडी चौकट’ असे तर आर. टी. चव्हाण यांचा उल्लेख ‘रिकी चौहान’ असा करण्यात आला आहे. पोलीस वार्तापत्र ‘बाय मेल’नागपूर ग्रामीण पोलिसांनी विविध कामांसाठी या वेबसाईटचा उपयोग करण्यात येईल सांगितले होते, त्यापैकी एक होते दैनंदिन पोलीस वार्तापत्र! यात दररोज पोलीस वार्तापत्र (प्रेसनोट) उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र अद्याप एकही पोलीस प्रेसनोट वेबसाईटवर उपलब्ध नाही. याबाबत एकदा तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांना विचारणा केल्यावर त्यांनी प्रेस नोट मेलवर पाठविण्याचा उपक्रम ६ मार्चपासून राबविला. सध्याही याच पद्धतीचा उपयोग करण्यात येत आहे.