शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

तुकाराम मुंढेंवर कारवाईसाठी सत्ताधारी विधानसभेत आक्रमक; आ. खोपडेंना धमकी देणाऱ्यावर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 06:13 IST

काही मर्जीतल्या कंत्राटदारांना २० कोटी रुपयांचे नियमबाह्य पेमेंट केले होते.  काही महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केली होती. दोन्ही प्रकरणांचे एफआयआर तेव्हा पोलिसांकडे दाखल झाले होते, असेही खोपडे म्हणाले.

नागपूर :  सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या समर्थकाने भाजपचे आ. कृष्णा खोपडे यांना फोनवर धमकी दिल्याचा मुद्दा मंगळवारी विधानसभेत गााजला. सत्ताधाऱ्यांनी या मुद्यावर कामकाजही बंद पाडले. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धमकी देणाऱ्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वस्त करीत मुंढे यांच्या बाबतची सर्व माहिती घेऊन वस्तुस्थितीदर्शक निवेदन केले जाईल, असे स्पष्ट केले.

आ. कृष्णा खोपडे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत या मुद्याकडे सरकारचे लक्ष वेधले. नागपुरातील ‘स्मार्ट सिटी प्रकल्पा’त मुंढे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा लावून धरणारी लक्षवेधी  लावल्यानंतर मुंढे समर्थकाने आपल्याला फोन करून धमकी दिल्याची तक्रार आ. खोपडे यांनी केली.  त्यांनी काही मर्जीतल्या कंत्राटदारांना २० कोटी रुपयांचे नियमबाह्य पेमेंट केले होते.  काही महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केली होती. दोन्ही प्रकरणांचे एफआयआर तेव्हा पोलिसांकडे दाखल झाले होते, असेही खोपडे म्हणाले.

काँग्रेसचे गटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी मुंढे यांची बाजू घेतली. आमदारांना धमकी देणाऱ्यावर नक्की कारवाई करा, पण सत्यस्थिती पडताळून पाहा. तत्कालीन आयुक्तांनी मुंढे यांचा दोष नसल्याचे स्पष्ट केले होते. महिला आयोगानेही तक्रारकर्त्या महिला कर्मचाऱ्यांवरच ताशेरे ओढले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Action urged against Tukaram Mundhe; MLA threatened, CM assures action.

Web Summary : Ruling party demands action against Tukaram Mundhe after an MLA received threats. CM assures investigation and action. MLA alleges corruption; Congress defends Mundhe, citing previous exonerations.
टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन