शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
2
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
3
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
4
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
5
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
6
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
7
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
8
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
9
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
10
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ
11
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
13
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
14
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
15
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
16
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
17
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
18
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
20
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...

राज्यकर्त्यांनी स्वार्थासाठी सरकारी डेअरी बंद पाडल्या

By admin | Updated: June 5, 2017 01:48 IST

नागपूरची शासकीय डेअरी बंद होती. नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतल्याने ती आता सुरू झाली.

मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका : प्रत्येक जिल्ह्यातील डेअरी जिवंत करणारलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरची शासकीय डेअरी बंद होती. नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतल्याने ती आता सुरू झाली. यापूर्वीच्या राज्यकर्त्यांनी स्वत:च्या डेअरी उघडल्या व सरकारच्या बंद पाडल्या. त्यांनी स्वत:चा फायदा पाहिला. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्याचे हित साधले गेले नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. शेतकरी संपात दूध रस्त्यावर फेकून निषेध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेले हे वक्तव्य संपाच्या आडून नेम साधणाऱ्या विरोधकांना चिमटे काढणारे आहे.मदर डेअरी व राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर डेअरी संयंत्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आले. या वेळी केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंग, केंद्रीय भृपूष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे अध्यक्ष दिलीप राठ, व्यवस्थापकीय संचालक शिवा नागराजन, आ. सुधाकर देशमुख, डॉ. मिलिंद माने, डॉ. आशिष देशमुख, मलिकार्जुन रेड्डी, महापौर नंदा जिचकार, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्यासह मोठ्या संख्येने दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने (एनडीडीबी) विदर्भ- मराठवाड्यातील तीन हजार गावात काम सुरू केले आहे. बोर्डाने चांगली व्यवस्था उभी केली आहे. येथे पारदर्शी कारभार असून भ्रष्टाचाराला वाव नाही. भविष्यात आपल्याला मोठे नेटवर्क उभारायचे असून प्रत्येक जिल्ह्यातील डेअरी जिवंत केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. एनडीडीबीमार्फत प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाऊन कृत्रिम रेतनाने जनावरांच्या दर्जेदार प्रजाती तयार केल्या जातील. पशुखाद्य तयार करण्यासाठी शेतकरी गटाला मदत दिली जाईल. एवढेच नव्हे तर शहरामंध्ये दूध वितरणासाठी ‘मिल्क बूथ’ उभारण्याकरिता प्रत्येक शहरात जागा उपलब्ध करून देण्याचा आदेश नगर विकास विभागाला सांगून काढला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विदर्भ व मराठवाडा हा आत्महत्याग्रस्त प्रदेश असल्याचे सांगून विदर्भ डेअरी विकास बोर्डाने हे दोन्ही विभाग आपल्याकडे घेऊन दूध उत्पादनात क्रांती करावी, असे आवाहन केले. सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करीत आहे, असे सांगत काही राजकीय मंडळी सरकारला बदनाम करू पाहत आहेत, असा आरोप पशुपालन व शेती विकास मंत्री महादेव जानकर यांनी केला. विरोधकांनी शेतकऱ्यांसाठी घोषणा केल्या, कृती नाही : राधा मोहन सिंहपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आठ लाख शेतकऱ्यांना सॉईल हेल्थ कार्ड दिले. जैविक शेतीचे क्षेत्र २० लाख हेक्टरपर्यंत पोहचले आहे. यावर्षी सूक्ष्म सिंचनावरील बजेट वाढविण्यात आले आहे. आम्हाला शेतकऱ्यांना सशक्त करायचे आहे. विरोधकांनी ते सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या विकासासाठी नारे दिले, घोषणा केल्या. पण प्रत्यक्षात अंमलबजावणी केली नाही, अशी टीका केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांनी केली. ते म्हणाले, वाजपेयी सरकारने २००४ मध्ये शेतकरी आयोग नेमला. २००७ मध्ये आलेल्या अहवालात गुंतवणुकीच्या दीडपट मिळकत व्हावी, अशी शिफारस केली होती. मात्र, ती नंतरच्या सरकारने लागू केली नाही. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीडपट नफा देण्याचे वक्तव्य करताच काही लोकांना पोटदुखी झाली आहे. आता ते हमी भाव वाढेल तर मिळकत वाढेल, अशी भूमिका मांडत आहेत. १० वर्षे सत्तेत असताना त्यांना या बाबीचा विसर का पडला होता, असा सवाल त्यांनी केला. पूर्वीचे सरकार केमिकल कंपन्यांना युरिया देत होते. पंतप्रधान मोदी यांनी युरिया निम कोटेड केला. यामुळे योग्य दरात, योग्य वेळी शेतकऱ्यांना युरिया मिळू लागला आहे. त्यांच्या काळात जेव्हा शेतकऱ्यांना युरिया मिळत नव्हता तेव्हा हे राजकुमार कुठे होते, जे आता शेतकऱ्यांच्या घरी जाऊन खाटेवर झोपण्याचे नाटक करीत आहेत, अशी टीका त्यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव न घेता केली. विदर्भात दूध क्रांती होईल : गडकरी नितीन गडकरी म्हणाले, नागपूर डेअरीचा प्रकल्प सुरू करण्यासाठी आपण वर्र्षभरात दिल्ली येथे सात बैठका घेतल्या. गुजरातमध्ये जाऊन राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. नागपूर डेअरी बंद होती. आता तेथे नवीन मशीन लागली आहे. केंद्र सरकारने येथील दूध विकास प्रकल्पासाठी ६५० कोटींचे अनुदान दिले आहे. मुख्यमंत्री बजेटमधून आणखी निधी देण्यास तयार आहेत. २०१९ पर्यंत येथे दोन लाख लिटर दूध संकलित होईल. मात्र, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने शेतकऱ्यांना सहकार्य केले तर ते सहा महिन्यातच दोन लाख लिटर दूध उपलब्ध करून देऊ शकतात. विदर्भात दूध क्रांती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरात ४० ठिकाणी मदर डेअरीचे स्टॉल लावण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी महापालिकेचे आभार मानले.