शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ : वाहन परवान्याची कामे सोमवारपासून सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 22:32 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर तब्बल तीन महिन्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन परवान्याची कामे सोमवार २२ जूनपासून सुरू होत आहे.

ठळक मुद्देशिकाऊसाठी रोज ५० तर कायम परवान्यासाठी ९० चा कोटा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर तब्बल तीन महिन्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन परवान्याची कामे सोमवार २२ जूनपासून सुरू होत आहे. परंतु फिजिकल डिस्टन्सिंगमुळे शिकाऊ परवान्यासाठी रोज ५० तर कायम परवान्यासाठी ९० उमेदवारांचा कोटा निश्चित करण्यात आल्याने परवान्यासाठी अर्ज करणाऱ्यावर दोन ते तीन महिन्याची प्रतीक्षा करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा देणारी शासकीय कार्यालये सुरू ठेवण्यात आली होती. नागपूर आरटीओमध्ये केवळ अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाºया वाहनांना परवाना देणे, तसेच नवीन वाहनांची नोंदणी सोडून इतर सर्व कामे बंद होती. आता परिवहन आयुक्तांच्या नव्या आदेशानुसार शिबिर कार्यालयांमधील कामे वगळता उर्वरित सर्व कामांना सोमवारपासून सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. यात परवाना जारी करणे, दुय्यम परवाना काढणे, परवानाविषयक सर्व कामे होणार आहे. याशिवाय वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, वाहनविषयक सर्व कामे, वायुवेग पथक आदी कामकाज नागपूर शहर, ग्रामीण आरटीओ व पूर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरू होणार आहे.आरटीओ कार्यालयातील उपलब्ध कर्मचारी यांच्या संख्येनुसार प्रत्येक कामाकरिता कोटा निश्चित करण्यात आला आहे. शिकाऊ परवान्यासाठी ५० अर्जांचा कोटा तर पक्क्या परवान्याकरिता ९० अर्जांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. तसेच कोरोना प्रादुर्भावाच्या काळात ज्या परवाना अर्जदारांनी अपॉईंटमेंट घेतली होती अशा अर्जदारांचे अपॉईंटमेंट रि-शेड्यूल करण्यात आले आहे. त्यासंबंधीचा मॅसेज संबंधित अर्जदारांच्या मोबाईलवर पाठविण्यात आल्याचे आरटीओकडून कळविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, लॉकडाऊनपूर्वी शिकाऊ वाहन परवान्याचा २०० तर पक्क्या वाहन परवान्याचा १५० वर कोटा होता. यामुळे प्रतीक्षेची यादी लांबणार आहे.कार्यालयात प्रवेशासाठी मास्क व हॅण्डग्लोव्हज आवश्यकआरटीओ कार्यालयात प्रवेशासाठी मास्क व हॅण्डग्लोव्हज आवश्यक असल्याचेही आरटीओने म्हटले आहे. तसेच ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनावर एका उमेदवाराची चाचणी झाल्यानंतर व वाहन सॅनिटायझेशन केल्यानंतरच दुसऱ्या उमेदवाराची चाचणी घेण्यात येणार आहे. योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्यासाठी आलेल्या वाहनांचे सॅनिटायझेशन झाल्यानंतरच चाचणी करण्यात येणार असल्याचीही अट घालण्यात आली आहे. सॅनिटायझेशनचा खर्च वाहन मालकाला करावयाचा आहे.वाहनांशी निगडित कागदपत्रांची मुदत ३० सप्टेंबरपर्यंतलॉकडाऊनच्या काळात मुदत संपलेली किंवा मुदत संपणारी वाहनांशी निगडित सर्व कागदपत्रांची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामध्ये गाडी चालवण्याचा परवाना, गाडीचे नोंदणी प्रमाणपत्र, विविध प्रकारचे परमिट, फिटनेस प्रमाणपत्र आणि इतर संबंधित प्रमाणपत्रांचा समावेश आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर