शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दलालांच्या विळख्यात आरटीओ

By admin | Updated: May 21, 2017 02:27 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) दलाल आढळल्यास थेट प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल,

ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालय : शुल्क भरण्याच्या खिडकीजवळच लागतात दलालांचे टेबल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) दलाल आढळल्यास थेट प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेश तत्कालीन परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी काढले होते. त्यावेळी सर्व आरटीओ कार्यालयांमध्ये दलालांना हुसकावून लावण्यासाठी नवी यंत्रणा सज्ज झाली होती, परंतु आता पुन्हा आरटीओ कार्यालये दलालांच्या विळख्यात सापडली आहेत. विशेषत: नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयात कर्मचारी कोण व दलाल कोण याचा थांगपत्ता लागत नसल्याचे चित्र आहे. शुल्क भरण्याच्या खिडकीशेजारीच दलालांचे टेबल लागत असल्याने या कार्यालयाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शासनाला ११५ कोटींचा महसूल मिळवून देणाऱ्या नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयात ‘सोई दाखवा बक्षीस मिळवा’, असेच चित्र आहे. कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्या वाहनधारकांना भरउन्हात उभे रहावे लागते, तर कर्मचाऱ्यांना तापत्या टिनाच्या शेडखाली घाम पुसत अर्जदारांचे काम करावे लागत असल्याचे विदारक चित्र आहे. विशेष म्हणजे, या कार्यालयाच्या स्वत:च्या इमारतीचे बांधकाम २०१४ पासून सुरू आहे, परंतु तीन वर्षांचा कालावधी लोटूनही बांधकाम अपूर्णच असल्याने याचा फटका कार्यालयातील कर्मचाऱ्यांपासून ते अधिकाऱ्यांसह विविध कामानिमित्त येणाऱ्या वाहनधारकांनाही बसत आहे. याचा फायदा मात्र दलाल घेत आहे. विशेष म्हणजे, परिवहन विभागाने आपली बहुतांश कामे आॅनलाईन केली असली तरी सामान्यांना याची माहिती नसल्याने, अनेकांकडे अद्यावत संगणक व्यवस्थेची सोय नसल्याने साधा शिकाऊ परवाना काढण्यासाठी दलालांची मदत घ्यावी लागत असल्याचे वास्तव आहे. या कार्यालयाच्या परिसरात तर ५०हून अधिक व्यक्ती आॅनलाईन कामे करण्यासाठी सर्रास ‘लॅपटॉप’ घेऊन बसल्या आहेत. तर त्यांच्या सोबतील शेकडो दलाल आहेत. परिणामी, कार्यालय शुल्काच्या दुप्पट रक्कम अर्जदारांची यांच्यावर खर्च होत आहे. आॅटोरिक्षांच्या पासिंगसाठी माराव्या लागतात खेटा नागपूर जिल्हा आॅटो चालक-मालक महासंघाचे महासचिव हरीशचंद्र पवार यांनी आरोप लावला आहे की, ग्रामीण आरटीओ कार्यालयांमध्ये दलालांचा हस्तक्षेप वाढला असून भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले आहे. आॅटोरिक्षाच्या पासिंगसाठी चार ते पाच चक्कर माराव्या लागतात. १५ दिवसानंतरही वाहनांचे ‘फिटनेस’ प्रमाणपत्र मिळत नाही. नवीन वाहन नोंदणीचे कागद कार्यालयात न राहता दलालांकडे असतात. या सर्व समस्यांची माहिती लवकरच केंद्रीय परिवहन मंत्री, राज्य परिवहन मंत्री व परिवहन आयुक्तांना देण्यात येईल, असेही पवार यांनी पत्रकात म्हटले आहे.