शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ कर्मचारी मंगळवारपासून संपावर; आकृतीबंध अंमलबजावणीची मागणी

By सुमेध वाघमार | Updated: September 23, 2024 17:07 IST

Nagpur : संपामुळे नागपूर शहर, आरटीओ व पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज प्रभावित होण्याची शक्यता

सुमेध वाघमारे नागपूर : आकृतीबंधाचा अंमलबजावणीसह महसुल स्तरावरील बदल्या रद्द करण्याच्या मागणीसाठी मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. या संपामुळेनागपूर शहर व नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) व पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज प्रभावित होण्याची शक्यता आहे.   

मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना महाराष्ट्राचे सहसचिव व नागपूर शहर विभागाचे कार्याध्यक्ष गजानन राठोड यांनी ‘लोकमत’ला सांगीतले, मोटार वाहन विभागासाठी शासनाने  सुधारीत आकृतीबंध २३ सप्टेंबर २०२२ पासून लागू केले. परंतू त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती रखडल्या. आकृतीबंधाची योग्य अंमलबजावणी न करता त्याचा आधार घेऊन महसूल विभागस्तरावर बदल्या करण्याची सुत्र शासनाने स्विकारली आहेत. त्यामुळे  ३१ आॅगस्ट २०२४ रोजी महसूलस्तरावर बदल्या करण्यात आल्या. या बदल्या मान्य नसल्याने कर्मचाऱ्यांनी न्यायालयात (मॅट) दाद मागून त्यावर स्थगिती आदेश पारीत केला आहे.   

आकृतीबंधाच्या अंमलबजावणीस टाळाटाळ होत असल्यामुळे व महसूल विभागीय बदल्यांचे धोरण रद्द करण्याच्या मागणीसाठी मोटार वाहन विभागातील कर्मचारी २४ सप्टेंबर २०२४ पासून बेमुदत संपावर जात आहे. या संदर्भातील निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी नगपूर (शहर) व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर (पूर्व) यांना देण्यात आले आहे. शिष्टमंडळात राठोड यांच्यासह जिल्हा अध्यक्ष मंगेश कडू, प्रशांत रामटेके, श्रीराम पारसे, कैलास डुकरे, अतुल डाकरे, अतुल गेडाम , जयंत देशमुख, विवेक बोंबले, आशिष उपासे, अशोक महल्ले, सुजाना मेश्राम, अमोल राठोड, किरण धमगाये आदींचा सहभाग होता. नागपुरातील तिन्ही आरटीओ कार्यालयातील चतुर्थ व तृतीय श्रेणीतील जवळपास १०० वर कर्मचारी या बेमुदत संपात सहभागी होणार आहे. त्यामुळे वाहन नोंदणीपासून ते लायसन्सची कामे प्रभावित होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूरStrikeसंप