शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठाच्या पदव्यांवर पुढील वर्षापासून विद्यार्थ्याचे छायाचित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 11:53 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्यांमध्ये पुढील वर्षीपासून आमूलाग्र बदलाची शक्यता आहे. पदवीवर विद्यार्थ्यांचे छायाचित्रदेखील असावे, यासंदर्भात विद्यापीठाचा विचार सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देविद्यापीठ ‘स्मार्ट’ पदव्यांवर भर देणारगैरप्रकारांना आळा घालण्याचा इरादा

आॅनलाईन लोकमतनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्यांमध्ये पुढील वर्षीपासून आमूलाग्र बदलाची शक्यता आहे. पदवीवर विद्यार्थ्यांचे छायाचित्रदेखील असावे, यासंदर्भात विद्यापीठाचा विचार सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. देशभरात ‘बोगस’ पदव्यांची विविध प्रकरणे समोर येत असल्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने पदव्यांना सुरक्षित करण्यासंदर्भात निर्देश जारी केले होते, हे विशेष.शैक्षणिक क्षेत्रात गेल्या तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात ‘ई-रिफॉर्म्स’ होत आहे. या पार्श्वभूमीवर पदवी प्रमाणपत्रांसह विविध प्रमाणपत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. काही विद्यापीठांनी पदवीवर ‘क्यू.आर.कोड’ वापरण्यासदेखील सुरुवात केली. मात्र सोबतच तंत्रज्ञानाचाच उपयोग करून गैरप्रकार उघडकीस आले आहे. त्यामुळेच प्रमाणपत्र, गुणपत्रिका व पदवीची सुरक्षितता याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव डॉ.जसपाल संधू यांनी निर्देश जारी केले होते. यानुसार विद्यार्थ्यांची ओळख पटविण्यासाठी प्रमाणपत्रांवर त्यांचे छायाचित्र आणि आधार क्रमांक नमूद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानेदेखील पदवीच्या प्रारुपात बदल करण्याचा निर्णय घेतला होता. २०१४ साली परीक्षा मंडळाने संबंधित प्रस्तावाला मंजुरी दिली होती. यानुसार पदवीवर विद्यार्थ्यांचे छायाचित्र व स्वाक्षरीचा समावेश होणार होता. सोबतच इतरही ‘स्मार्ट फिचर’ समाविष्ट होणार होते. मात्र काही कारणांमुळे ही बाब पूर्णत्वास येऊ शकली नाही. २०१८ ला पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाºया विद्यार्थ्यांच्या पदव्यांमध्ये हा बदल दिसू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना विचारणा केली असता विद्यार्थ्यांची छायाचित्रे पदवीवर देण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचे मान्य केले. या वर्षी हे करणे शक्य नाही. कारण पदवी प्राप्त करणाºया विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे व वेळ कमी आहे. शिवाय पदवीवर विद्यार्थ्यांचे नेमके कुठले छायाचित्र असेल याबाबतदेखील निर्णय घ्यावा लागणार आहे. सद्यस्थितीत विद्यापीठात नामांकन नोंदणीच्या वेळी विद्यार्थ्यांची छायाचित्रे घेतली जातात. मात्र अंतिम वर्षापर्यंत विद्यार्थ्यांमध्ये बदल होतो. त्यामुळे याबाबत निर्णय घेऊन पुढील वर्षीपासून याची अंमलबजावणी करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :educationशैक्षणिक