शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीआय : कामचुकारपणासाठी बहाणा संक्रमणाचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 23:15 IST

कोरोना संक्रमणाची धास्ती सर्वत्र पसरली आहे. शासकीय विभागांमध्ये, याच धास्तीचे कारण पुढे करून कामचुकारपणा केला जाता आहे. महानगरपालिकेत आरटीआयचे अर्ज करणाऱ्यांना, थेट नकार कळवला जात आहे.

ठळक मुद्देअर्ज स्वीकारण्यास टाळाटाळमनपा अधिकारी म्हणताहेत, पोस्टाने अर्ज पाठवा!

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संक्रमणाची धास्ती सर्वत्र पसरली आहे. शासकीय विभागांमध्ये, याच धास्तीचे कारण पुढे करून कामचुकारपणा केला जाता आहे. महानगरपालिकेत आरटीआयचे अर्ज करणाऱ्यांना, थेट नकार कळवला जात आहे. त्यासाठी वरिष्ठांचा आदेश असल्याचा बहाणा केला जात असून, पोस्टाने अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. विशेष म्हणजे, स्वहस्ते अर्ज स्वीकारताना संक्रमणाची भीती असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोस्टमनच्या हातूनच लेटर स्वीकारायचे आहे. तेव्हा तेथून संक्रमण होणार नाही का, असा सवाल आहे.शहरातील आरटीआय कार्यकर्ता सचिन खोब्रागडे गेल्या १५ दिवसापासून एक अर्ज घेऊन मनपाचे चक्कर कापत आहेत. परंतु, संक्रमणाचा काळ बघता सामान्य प्रशासन विभागाने अर्ज स्वीकारणे बंद केल्याचे सांगत, त्यांना परत पाठविले जात आहे. या बाबतीत खोब्रागडे यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त मनपा आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन यांच्याकडे तक्रार केली आहे.आशा वर्कर्ससंदर्भात हवी आहे माहितीखोब्रागडे यांना आशा वर्कर्ससंदर्भात माहिती हवी होती. कोरोना संक्रमणाच्या काळात उच्च न्यायालयाने आशा वर्कर्सना दैनिक २०० रुपये मानधन देण्याचे स्पष्ट केले होते. या संदर्भातच आरटीआयद्वारे त्यांना माहिती हवी आहे. संक्रमणाच्या काळात किती आशा वर्कर्सना या योजनेचा लाभ झाला? केंद्र सरकारने कोरोना संदर्भात केलेल्या विमा योजनेत किती आशा वर्कर्सना सहभागी केले, याची माहिती त्यांना हवी होती.मनपामध्ये आतापर्यंत ४०० लोक संक्रमित झाले आहेत. त्यामुळेच, येथे येणाºयांना केवळ महत्त्वाचे काम घेऊनच या असे आवाहन करण्यात आले आहे. आरटीआयचे अर्ज आमच्या ग्रीवन्स अ‍ॅपवरही पाठविता येऊ शकतात. पोस्ट आणि ईमेलद्वारेही हे अर्ज आम्ही स्वीकारत आहोत. टाळण्याच्या मागचा उद्देश सुरक्षेचा आहे आणि यासाठी नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.निर्भय जैन, उपायुक्त, मनपा

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाRight to Information actमाहिती अधिकार