शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

नागपूर जिल्ह्यात तीन दिवसात आरटीईचे १० हजारावर अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 21:11 IST

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पालकांच्या मुलांना ‘आरटीई’अंतर्गत नामांकित शाळेत प्रवेश घेता येते. त्यामुळे पालकांचा आरटीईच्या प्रवेशाकडे चांगलाच कल असतो. ५ मार्च रोजी सायंकाळी ऑनलाईन अर्ज भरण्याला सुरुवात झाली. तीन दिवसात १० हजार पालकांनी अर्ज भरले आहेत.

ठळक मुद्देपालकांच्या मार्गदर्शनासाठी ११२ केंद्रे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पालकांच्या मुलांना ‘आरटीई’अंतर्गत नामांकित शाळेत प्रवेश घेता येते. त्यामुळे पालकांचा आरटीईच्या प्रवेशाकडे चांगलाच कल असतो. ५ मार्च रोजी सायंकाळी ऑनलाईन अर्ज भरण्याला सुरुवात झाली. तीन दिवसात १० हजार पालकांनी अर्ज भरले आहेत.नागपूर जिल्ह्यात आरटीई अंतर्गत ६७५ शाळांची नोंद झाली असून, ७१९२ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन अर्ज भरताना संकेतस्थळाचे सर्व्हर स्लो असल्यासोबतच अनेक तांत्रिक अडचणीं येत आहे. तरीसुद्धा पालकांचा प्रतिसाद भरपूर मिळतो आहे. पालकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शिक्षण विभागाने स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने ११२ केंद्रे सुरू केली आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी यशवंत स्टेडियममध्ये केंद्र सुरू केले आहे. याशिवाय घरबसल्या अर्ज करण्यासाठी आरटीईचा अ‍ॅप तयार केला आहे. त्याद्वारेही १४ पालकांनी अर्ज भरले आहे.सधन पालकांचाही आरटीईकडे कलआरटीईचा लाभ हा केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना व्हावा, हा उद्देश आहे. त्यासाठी एक लाखाच्या आत वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ठेवली आहे. एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेलेही आरटीईमध्ये नशीब आजमावत आहे. तहसीलदारांकडून एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचा दाखला तयार करून आरटीईचे अर्ज भरत आहे.खोटी माहिती दिल्यास अर्ज रद्द होतीलआरटीईच्या प्रवेशासाठी उत्पन्न हा महत्त्वाचा निकष आहे. उत्पन्नाचे खोटे दाखले दिले असले तरी, अर्जाची छाननी करताना उत्पन्न जास्त आढळल्यास त्यांचे अर्ज रद्द होणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली .नंदनवनच्या विद्यार्थ्याला तेलंगखेडीची शाळाआरटीईच्या नियमानुसार तीन किलोमिटरच्या आत विद्यार्थ्यांना शाळा मिळणे गरजेचे आहे. पण ऑनलाईन अर्ज करताना गुगल लोकेशनमध्ये नंदनवनच्या विद्यार्थ्यांना तेलंगखेडीच्या शाळा दाखविण्यात येत आहे. नियम जर तीन किलोमीटरचा असेल तर ऑनलाईनमध्ये तीन किलोमिटरच्या आतील शाळा दाखविणे गरजेचे आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाStudentविद्यार्थी