शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांमुळे लांबला संघाचा तृतीय वर्ष वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:48 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तृतीय वर्ष वर्ग मागील वर्षी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीमुळे प्रकाशझोतात आला होता. साधारणत: मेच्या मध्यात सुरू होणारा हा वर्ग यंदा २२ मेपासून सुरू होणार आहे. लोकसभा निवडणुकांमुळे हा वर्ग लांबला असल्याची चर्चा आहे. यंदा या वर्गाच्या समारोपाला कोण अतिथी राहणार, याबाबत संघाने अद्यापपर्यंत गुप्तता बाळगली आहे.

ठळक मुद्दे२२ मेपासून सुरुवात : यंदा कोण राहणार अतिथी?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तृतीय वर्ष वर्ग मागील वर्षी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीमुळे प्रकाशझोतात आला होता. साधारणत: मेच्या मध्यात सुरू होणारा हा वर्ग यंदा २२ मेपासून सुरू होणार आहे. लोकसभा निवडणुकांमुळे हा वर्ग लांबला असल्याची चर्चा आहे. यंदा या वर्गाच्या समारोपाला कोण अतिथी राहणार, याबाबत संघाने अद्यापपर्यंत गुप्तता बाळगली आहे.तृतीय वर्षाचा प्रशिक्षण वर्ग संघात महत्त्वाचा मानला जातो. देशभरातील विविध प्रांतांमधील स्वयंसेवक यात सहभागी होतात. तृतीय वर्ष वर्गासाठी स्वयंसेवकांची काही विशिष्ट निकषांद्वारे निवड करण्यात येते. संघाच्या सर्व प्रांतांमध्ये जिल्हा पातळीवर महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या तसेच तहसील पातळीवर दोन वर्षांहून अधिक काम केलेल्या स्वयंसेवकांना येथे संधी देण्यात येते. दरवर्षी साधारणत: १० ते १५ मेच्या दरम्यान हा वर्ग सुरू होतो. मात्र यंदा लोकसभा निवडणुका सुरू आहेत. अखेरचा टप्पा १९ मे रोजी आहे. संघ जरी निवडणुकांमध्ये सक्रियतेने सहभागी नसला तरी संघाचे स्वयंसेवक विविध माध्यमांतून निवडणुकीच्या प्रक्रियेचा भाग झाले आहेत. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्याच्या अगोदरपासूनच ‘शत-प्रतिशत’ मतदानासाठी संघाकडून प्रयत्न करण्यात आले. यासाठी स्वयंसेवकांनी गावपातळीपासून ते अगदी सोशल चावडीपर्यंत मोहिमच राबविली होती. अखेरच्या टप्प्पाचे मतदान १९ मे रोजी आहे. यात बिहारमधील सहा, हिमाचल प्रदेशमधील चार, झारखंड येथील तीन, मध्य प्रदेशमधील आठ, पंजाबमधील सर्वच्यासर्व १३, उत्तर प्रदेशमधील १३, पश्चिम बंगालमधील नऊ जागांचा प्रामुख्याने समावेश आहे. या सर्व ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी संघ परिवारातील संघटनांचे प्रयत्न सुरू आहे. अशास्थितीत या भागांमधील स्वयंसेवकांना तृतीय वर्ष वर्गात येता यावे यासाठी यंदा वर्गाचे आयोजन उशिरा करण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली. २०१४ मध्ये लोकसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतरच तृतीय वर्ष वर्गाला सुरुवात झाली होती.संघ वर्ग सुरू होण्याची तारीखवर्ष         तारीख२०१४     १९ मे२०१५     ११ मे२०१६     १६ मे२०१७     १५ मे२०१८     १४ मे

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर