शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शहरी नक्षलवादावर संघाचा प्रहार :देशाविरोधात रचताहेत षडयंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 20:30 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाच्या माध्यमातून सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी शहरी नक्षलवादावर जोरदार प्रहार केला. देशात अनेक छोट्या-मोठ्या घटनांना सुनियोजीत पद्धतीने वादाचे रूप दिले जात आहे. विद्यापीठांमधील वातावरण बिघडवणे सुरू आहे. शहरी माओवाद्यांकडून पाकिस्तान, इटली, अमेरिका यासारख्या देशात तयार झालेले संदेश प्रसारित करुन भारताच्या अंतर्गत सुरक्षेला खिंडार पाडण्यासाठी मानसशास्त्रीय युद्धाची रचना केली जात आहे, अशी टीका त्यांनी केली.

ठळक मुद्दे शिक्षणव्यवस्थेतील धोरणांबाबत नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाच्या माध्यमातून सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी शहरी नक्षलवादावर जोरदार प्रहार केला. देशात अनेक छोट्या-मोठ्या घटनांना सुनियोजीत पद्धतीने वादाचे रूप दिले जात आहे. विद्यापीठांमधील वातावरण बिघडवणे सुरू आहे. शहरी माओवाद्यांकडून पाकिस्तान, इटली, अमेरिका यासारख्या देशात तयार झालेले संदेश प्रसारित करुन भारताच्या अंतर्गत सुरक्षेला खिंडार पाडण्यासाठी मानसशास्त्रीय युद्धाची रचना केली जात आहे, अशी टीका त्यांनी केली.शहरी माओवाद्यांच्या षडयंत्रात राजकीय महत्वाकांक्षी व्यक्ती किंवा समहू, दुर्बल वर्ग यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यासाठी व त्यांचा उपयोग करण्यासाठी ओढण्यात येत आहे. येणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून समाजात फुटीरता, हिंसा, द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. ‘भारत तेरे टुकड़े होंगे’ अशा घोषणा ज्या समूहांतून आल्या, त्यांचेच प्रमुख चेहरे अप्रिय घटनांमध्ये प्रमुखतेने आपल्या चिथावणीखोर भाषणांच्या माध्यमातून समोर आले. हिंसात्मक कारवायांचे पोषणकर्ते आता शहरी माओवादाला ढाल बनवत आंदोलनांत समोरच्या रांगांमध्ये दिसतात. शहरी माओवाद्यांची रचलेल्या जाळ्याचा सर्व घटनाक्रम केवळ विरोधकांचे सत्ताप्राप्तीचे राजकारण न राहता देशविदेशांतील भारतविरोधी शक्तींच्या मदतीने रचण्यात आलेले मोठे षडयंत्र आहे, असा आरोप यावेळी डॉ.भागवत यांनी केला.गांधी, आंबेडकर यांच्या कार्याचा गौरवयावेळी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत गौरवोद्गार काढले. देशात नागरिकांनी कायदा व संविधान यांच्या मयार्देत रहायला हवे. आपले राजकारणी तसेच प्रत्येक व्यक्तीने पूजनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचे नेहमी स्मरण केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. सत्य आणि अहिंसेच्या जोरावर राजकारण केलं जाऊ शकतं, याची कल्पना फक्त आपल्याच देशातील व्यक्ती करू शकते. महात्मा गांधी यांनी ते करुन दाखवलं आहे. केवळ नैतिक बळाच्या आधारावर त्यांनी इंग्रजांशी नि:शस्त्रपणे दोन हात केले, असे डॉ.भागवत म्हणाले.नवीन शैक्षणिक धोरण कधी ?नवीन पिढीवर संस्कार करण्याची गरज आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमांत पायाभूत सुसंस्कारांचा अभाव झाला आहे. शिक्षणाचे नवीन धोरण प्रत्यक्ष लागू होण्याच्या प्रतिक्षेत वेळ हातातून निघून चालली आहे. नवीन युगात जे चांगले आहे ते खुल्या मनाने आत्मसात करत अभद्र गोष्टींपासून वाचण्यासाठी नवीन पिढीत विवेक निर्माण करावा लागेल, असे प्रतिपादन डॉ.भागवत यांनी केले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnaxaliteनक्षलवादी