शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

RSS ला सातासमुद्रापार नेण्यात मौलिक वाटा! प्रचारक शंकरराव तत्ववादी यांचे निधन; PM मोदींनी व्यक्त केला शोक

By योगेश पांडे | Updated: March 13, 2025 21:44 IST

Shankar Rao Tatwawadi: अमेरिकेत हिंदू स्वयंसेवक संघाच्या शाखांची स्थापना करण्यात त्यांची मौलिक भूमिका होती व त्यांनी अमेरिकेत संघ विस्तारक म्हणून कार्य केले.

-योगेश पांडे, नागपूरराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक डॉ.शंकरराव तत्ववादी (९२) यांचे निधन झाले. संघाला सातासमुद्रापार नेण्यात त्यांची मौलिक भूमिका होती व त्यांनी विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या होत्या. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनीदेखील शोक प्रकट केला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

शंकरराव तत्ववादी यांचा निवास महाल येथील संघ मुख्यालयात होता. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून पीएचडी केली होती व त्यानंतर ते तेथीलच फार्मसी विभागाचे प्रमुख झाले होते. अमेरिकेत हिंदू स्वयंसेवक संघाच्या शाखांची स्थापना करण्यात त्यांची मौलिक भूमिका होती व त्यांनी अमेरिकेत संघ विस्तारक म्हणून कार्य केले. ते युनायटेड किंगडममध्येदेखील प्रचारक होते. 

१९९३ साली ते विश्व विभाग संयोजक झाले होते व ६० हून अधिक देशांत काम केले. त्यांच्या मार्गदर्शनातच संघाचा विविध देशांमध्ये विस्तार झाला. २०११ नंतर ते विज्ञान भारतीचे काम करत होते. संस्कृतचादेखील त्यांचा विशेष अभ्यास होता. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता संघ मुख्यालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या इच्छेनुसार एम्सला देहदान करण्यात आले.

पंतप्रधानांकडून श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटच्या माध्यमातून डॉ.तत्ववादी यांना श्रद्धांजली अर्पण केली. तत्ववादी हे राष्ट्र घडविण्यात व देशाच्या सांस्कृतिक पुनरुज्जीवनात त्यांनी दिलेल्या व्यापक योगदानाबद्दल कायम स्मरणात राहतील. ते नेहमीच तरुणांमध्ये जिज्ञासू भावना निर्माण करण्यास प्रोत्साहन देत असत. भारत आणि परदेशात अनेक प्रसंगी त्यांच्याशी संवाद साधल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. त्यांची वैचारिक स्पष्टता आणि कार्यशैली नेहमीच उल्लेखनीय राहिली, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानMaharashtraमहाराष्ट्र