शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

संघ पदाधिकाऱ्यांची फडणवीसांशी चर्चा, पद न सोडण्याचा दिला सल्ला

By योगेश पांडे | Updated: June 6, 2024 18:19 IST

Nagpur : संघाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानी जाऊन घेतली भेट

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणूकीच्या निकालात महायुतीला मोठा धक्का बसल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची जबाबदारी घेत उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दाखविली आहे. यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ॲक्शन मोडमध्ये आला आहे. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानी भेट घेत त्यांच्याची दीड तास चर्चा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता पद न सोडण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे.

गुरुवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास फडणवीस नागपुरात दाखल झाले. तेथून ते थेट त्यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी गेले. तेथे त्यांना भेटायला आलेल्यांची गर्दी होती. मात्र फडणवीस आज कुणालाच भेटणार नाहीत असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात संघाचे तीन पदाधिकारी अगोदरपासूनच फडणवीसांच्या घरी बसून होते. फडणवीस यांनी त्यांच्याशी भेट घेतली व दीड तास चर्चा चालली. त्यानंतर एका कारमध्ये बसून तीनही पदाधिकारी रेशीमबाग स्मृतिमंदिराच्या दिशेने रवाना झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या राजकीय परिस्थितीत फडणवीस यांना संयमाची भूमिका घेण्याची सूचना करण्यात आली आहे. पद सोडण्याचा विचार सध्या करू नका असा सल्लादेखील देण्यात आला आहे. ही भेट झाल्यावर पावणेपाच वाजताच्या सुमारास फडणवीस तातडीने नवी दिल्लीकडे रवाना झाले.

फडणवीसांना सल्ला की दिल्लीसाठी संदेश ?

सध्या नागपुरात संघाचा कार्यकर्ता विकास वर्ग - द्वितीय हा अखिल भारतीय पातळीवरील प्रशिक्षण वर्ग सुरू आहे. त्यानिमित्ताने सरसंघचालकांपासून संघाचे अनेक मोठे पदाधिकारी नागपुरातच आहे. निकालामुळे संघालादेखील धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर संघाच्या तीन पदाधिकाऱ्यांनी दीड तास फडणवीसांशी नेमकी काय चर्चा केली याबाबत त्यांनी मौन साधले. फडणवीस लगेच दिल्लीला रवाना झाल्याने संघाने त्यांच्या हाताने दिल्लीला काही महत्त्वाचा संदेश पाठविला आहे की काय या चर्चांनादेखील उधाण आले आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूरRSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय