शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्तांच्या खात्यात ९१ कोटी रुपये जमा

By admin | Updated: May 6, 2014 17:21 IST

निवडणुका, आचारसंहितेच्या धावपळीत महसूल प्रशासनाने नागपूर विभागातील १ लाख २३६९ गारपीटग्रस्तांच्या खात्यात एकूण ९१ कोटी रुपये जमा केले आहेत.

नागपूर : निवडणुका, आचारसंहितेच्या धावपळीत महसूल प्रशासनाने नागपूर विभागातील १ लाख २३६९ गारपीटग्रस्तांच्या खात्यात एकूण ९१ कोटी रुपये जमा केले आहेत. नागपूर जिल्ह्यातील ५५ हजार ८१३ शेतकर्‍यांना ६५ कोटी ७४ लाख रुपये वाटप करण्यात आले आहे.ऐन निवडणुकांच्या तोंडावर म्हणजे फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील २ लाख ५७ हजार ५८ शेतकर्‍यांच्या पिकांची हानी झाली होती. त्यात नागपूर जिल्ह्यातील १ लाख ५० हजार १२२ शेतकर्‍यांचा समावेश होता. सरकारने तातडीने पॅकेज जाहीर केले. पण आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात निवडणुकीच्या कामात यंत्रणा व्यस्त झाली. मात्र याही काळात मदत वाटप संथ होऊ नये याची काळजी घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी प्रत्येक जिल्हाधिकार्‍यांना दिल्या होत्या. गारपीटग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्या टप्प्यात १०० कोटी रुपये प्राप्त झाले होते. त्यापैकी ५ मेपर्यंत ९१ कोटी ५६ लाख रुपयांचे वाटप झाले आहे.नागपूर जिल्ह्यातील ५५ हजार ८१३ शेतकर्‍यांच्या खात्यात एकूण ६५कोटी ७४ लाख रुपये जमा करण्यात आले. वर्धा जिल्ह्यातील १५ हजार ७१९ शेतकर्‍यांना १२ कोटी ५७ लाख २० हजार, भंडारा जिल्ह्यातील ७१२७ शेतकर्‍यांना ५ कोटी २७ लाख, गोंदिया जिल्ह्यातील १३,०३९ शेतकर्‍याना ४ कोटी ६० लाख, चंद्रपूर जिल्ह्यातील १०,३९७ शेतकर्‍यांना ३ कोटी १६ लाख आणि गडचिरोली जिल्ह्यातील ३७४ शेतकर्‍यांना ३४ लाखाचे वाटप करण्यात आले आहे.मदत वाटपाचा दैनंदिन आढावा घेतला जात आहे. शासनाकडून निधी प्राप्त करण्यासाठी पाठपुरावाही सुरू आहे. शिल्लक निधी लवकरच प्राप्त होईल, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)गारपीटग्रस्तांना मदत वाटपजिल्हा शेतकरी रक्कम (कोटी)नागपूर ५५,८१३ ६५.७४वर्धा १५,७१९ १२.५७भंडारा ७,१२७ ५.१७गोंदिया १३,०३९ ४.६०चंद्रपूर १०,३९७ ३.१६गडचिरोली २७४ ०.३४