शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात ४१.८५ लाखांची सुपारी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 01:07 IST

वाडी पोलीस ठाण्याने दिलेल्या माहितीच्या आधारे वडधामना, अमरावती रोड येथील ए.व्ही.जी. लॉजिस्टिक पार्क लिमिटेड या कंपनीवर अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून ४१.८५ लाख रुपयांची कमी दर्जाची सुपारी जप्त केली.

ठळक मुद्देएफडीएची कारवाई : कमी दर्जा व असुरक्षित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाडी पोलीस ठाण्याने दिलेल्या माहितीच्या आधारे वडधामना, अमरावती रोड येथील ए.व्ही.जी. लॉजिस्टिक पार्क लिमिटेड या कंपनीवर अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून ४१.८५ लाख रुपयांची कमी दर्जाची सुपारी जप्त केली.दत्तवाडी, साई मंदिरजवळील रहिवासी विजय हरीशचंद्र शुक्ला (३७) हे कंपनीचे मालक आहेत. त्यांच्याकडे १६,१०० किलो सुपारी विक्रीसाठी साठविल्याचे आढळून आले. या साठ्यातून एक नमुना विश्लेषणास्तव घेण्यात आला असून उर्वरित ४१,८५,४८० रुपये किमतीचा १६,०९८ किलो सुपारीचा साठा सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदींनुसार कमी दर्जा आणि असुरक्षित असल्याच्या संशयावरून जप्त केला. पुढील आदेशापर्यंत अन्न व्यवसाय चालकाच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आला आहे.ही कारवाई अन्न व औषध प्रशासन नागपूर विभागाचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त (अन्न) शरद कोलते यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी स्मिता बाभरे व मनोज तिवारी तसेच वाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राजेंद्र बोराटे यांनी संयुक्तरीत्या केली. जनआरोग्याचा विचार करता या प्रकारची धडक मोहीम पुढेही सुरू राहणार आहे. गुटखा, पानमसाला, सुगंधित व स्वादिष्ट तंबाखू, सुगंधित व स्वादिष्ट सुपारी व खर्रा इत्यादी प्रतिबंधित पदार्थांचे उत्पादन, वितरण, साठवण व विक्री होत असल्याचे आढळल्यास त्याबाबत नागरिकांना कार्यालयात माहिती देता येईल. जनतेने विशेषत: युवा वर्गाने अशा पदार्थांचे सेवन करू नये, असे आवाहन केकरे यांनी केले आहे.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागnagpurनागपूर