शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पाच कोटीचे अत्याधुनिक मोबाईल आॅपरेशन थिएटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 21:35 IST

वेस्ट फॉर अ‍ॅनिमल मिशन रेबीज संस्थेच्या माध्यमातून भारतातील ११ शहरात मागील चार वर्षापासून मिशन रेबीच राबविल्या जात आहे. यात नागपूरचाही समावेश आहे. पाच कोटीची मिशन रेबीजची अत्याधुनिक मोबाईल व्हॅन (आॅपेशन थिएटर)नागपुरात २८ जुलैपर्यंत वास्तव्यास आहे. यात शस्त्रक्रियेसोबतच प्रशिक्षण कक्षाचीही सुविधा उपलब्ध आहेत.

ठळक मुद्देअत्याधुनिक मोबाईल व्हॅनमधून मिशन रेबीज२८ जुलैपर्यंत नागपुरात : पशुचिकित्सकांना तज्ज्ञाकडून प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेस्ट फॉर अ‍ॅनिमल मिशन रेबीज संस्थेच्या माध्यमातून भारतातील ११ शहरात मागील चार वर्षापासून मिशन रेबीच राबविल्या जात आहे. यात नागपूरचाही समावेश आहे. पाच कोटीची मिशन रेबीजची अत्याधुनिक मोबाईल व्हॅन (आॅपेशन थिएटर)नागपुरात २८ जुलैपर्यंत वास्तव्यास आहे. यात शस्त्रक्रियेसोबतच प्रशिक्षण कक्षाचीही सुविधा उपलब्ध आहेत.प्रोजवेस्ट फॉर अ‍ॅनिमल मिशन रेबीज ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे. यूकेस्थित मिशन रेबीज आणि वर्ल्डवाईड व्हेटरनरीसर्व्हिस इंटरनॅशनल ट्रेनिंग सेंटर (व्हीव्हीएस आयटीसी) यांच्या सहकार्याने मिशन रेबीज हा उपक्रम मागील पाच वर्षापासून राबविला जात आहे. देश-विदेशातील सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून या उपक्रमावर खर्च केला जातो. पशुवैद्यकांना तसेच पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांना पशुपक्षीय नियंत्रण आणि रेबीजचे लसीकरण संदर्भात प्रशिक्षण दिले जाते. यातून तज्ज्ञ पशुवैद्यक तयार व्हावे. हा यामागील हेतू असल्याची माहिती वेस्ट फॉर अ‍ॅनिमलचे सचिव डॉ. शशिकांत जाधव यांनी दिली. नागपुरात २ ते १४ जुलै तसेच १६ ते २८जुलै या दरम्यान महाराज बाग समोरील पशुवैद्यकीय रुग्णालयात ही अत्याधुनिक व्हॅन उभी करण्यात आलेली आहे. मिशन रेबीजच्या माध्यमातून आजवर ५५० पशुवैद्यकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.मिशनच्या माध्यमातून शहरातच नव्हे तर दुर्गम भागातही पशुवैद्यक व पशुपालकांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबवित आहे. सोबतच प्राण्यांना आजार झाल्यास त्यापासून घ्यावयाची काळजी व त्यावरील उपाययोजनांची माहिती प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिली जाते. तसेच अनेस्थेसिया, अल्ट्रासाऊं ड आणि पशु वर्तन याची माहिती दिली जाते. पशुवैद्यकीय व्यावसायिकांची पुढील पिढी अधिक तज्ज्ञ असावी, यासाठी प्रशिक्षणाकरिता उच्च दर्जाची उपकरणे वापरली जातात.कुत्र्यावरील जटील शस्त्रक्रि या केल्या जातात. यात टयुमर (कर्करोगाचा एक प्रकार) व अन्य गंभीर आजार असलेल्या कुत्र्यांचा समावेश असतो. नागरिकही आपल्या पाळीवर कुत्र्यावर उचपार करू शकतात, अशी माहिती जाधव यांनी दिली. वेस्ट फॉर अ‍ॅनिमलचे अध्यक्ष डॉ. श्रीधर गुदे यांच्यासह पथक या कामात सहकार्य करीत आहेत.प्रशिक्षणार्थींना अभ्यासाची संधीपशुवैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी तसेच या व्यवसायातील व्यक्तींना मिशन रेबीजच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध आहे. गेल्या चार आठवड्याच्या कालावधीत २० जणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिल्या बॅचला प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच पशुपालकांनाही मार्गदर्शन केले जाते.कुत्र्यांवर नसबंदीसाठी उपयोग व्हावानागपूर शहरात मोकाट कुत्र्यांची समस्या गंभीर आहे. वर्षाला आठ ते नऊ हजार लोकांना कुत्री चावा घेतात. याला आळा घालण्यासाठी मिशन रेबीजचा उपयोग व्हावा, अशी शहरातील नागरिकांची अपेक्षा आहे.

 

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाHealthआरोग्य