शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

नागपुरातील नवोदय बँकेत ३९ कोटींचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 23:05 IST

धंतोलीत मुख्यालय असलेल्या नवोदय बँकेत ३९ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची बाब पुढे आली आहे. अनेक दिवसांपासून या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी सायंकाळी संचालक मंडळ, अधिकारी आणि निवडक कर्जदारांविरुद्ध फसवणूक, एमपीआयडी आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. काँग्रेसचे नेते अशोक धवड हे बँकेचे सर्वेसर्वा असल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देपदाधिकारी, संचालक मंडळ, कर्जदार सहभागीवर्ष २०१०-२०१७ दरम्यान झाला घोटाळा, गुन्ह्याची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धंतोलीत मुख्यालय असलेल्या नवोदय बँकेत ३९ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची बाब पुढे आली आहे. अनेक दिवसांपासून या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी सायंकाळी संचालक मंडळ, अधिकारी आणि निवडक कर्जदारांविरुद्ध फसवणूक, एमपीआयडी आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. काँग्रेसचे नेते अशोक धवड हे बँकेचे सर्वेसर्वा असल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.धंतोली येथील सिल्व्हर पॅलेसमध्ये नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे मुख्यालय आहे. ही बँक अनेक वर्षांपासून आर्थिक घोटाळ्यामुळे चर्चेत होती. धंतोली पोलीस ठाणे आणि आर्थिक शाखेत घोटाळ्याची तक्रार करण्यात आली होती. पण काही कारणांमुळे गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता. पोलीस लेखा परीक्षकाच्या अहवालाच्या आधारे गुन्हा नोंदविण्यासाठी कानाडोळा करीत होती. जिल्हा विशेष लेखा परीक्षक श्रीकांत सुपे यांनी कोट्यवधींच्या आर्थिक घोटाळ्याचा अहवाल सादर करून तक्रार केल्यानंतर धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.आर्थिक घोटाळा वर्ष २०१० ते २०१७ या काळात झाला आहे. बँकेचे संचालक मंडळ अणि अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक घोटाळा केला आहे. त्यांनी नियम धाब्यावर बसवून जवळच्या निवडक कर्जदारांना कोट्यवधी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. एवढेच नव्हे तर जुने कर्ज अदा न करता नव्याने कर्जही मंजूर केले होते. कर्ज मंजूर करताना त्यांनी कागदपत्रे आणि संपत्तीचे आकलन केले नाही. कर्जाची परतफेड न करताच त्यांनी संपत्तीची मूळ कागदपत्रे कर्र्जदारांना परत केली. कर्जदारांवर कोट्यवधी रुपयांचे कर्ज थकीत असतानाही त्यांच्यावर कोणतेही कर्ज नसल्याचे पत्र संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांनी दिले.अनेक कर्जदारांनी दुसऱ्या ठिकाणी गहाण ठेवलेल्या संपत्तीवरसुद्धा कर्ज मिळविले. कर्ज देताना त्यांच्या संपत्तीची किंमत कागदोपत्री जास्त दाखविण्यात आली. अनेक कर्जदारांनी डमी लोकांना उभे करून कर्ज मंजूर केले. याची माहिती असतानाही संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांनी अर्जाला मंजुरी दिली. यादरम्यान घोटाळ्याची तक्रार पोलीस आणि रिझर्व्ह बँकेकडे करण्यात आली होती. रिझर्व्ह बँकेने वित्तीय व्यवहारावर निर्बंध लादले होते. त्यानंतरही संचालक मंडळ आणि पदाधिकाऱ्यांनी दुरुपयोग करून बँकेची कोट्यवधींची रक्कम गिळंकृत केली होती. रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधानंतरही वित्तीय व्यवहाराची बाब लपविण्यासाठी पदाधिकारी आणि संचालक मंडळाने नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या नावावर कॉम्प्युटरमध्ये लॉगिन केले. या माध्यमातून कॉम्प्युटरमध्ये नोंद केलेल्या व्यवहाराशी छेडछाड केली.कर्मचाऱ्यांना फसवून स्वत:ला वाचविण्यासाठी त्यांनी असे कृत्य केले होते. लेखा परीक्षणात पदाधिकारी आणि संचालक मंडळाने केलेली फसवणूक पुढे आली होती. रिझर्व्ह बँकेच्या दिशा-निर्देशानंतर वरिष्ठ लेखा परीक्षक श्रीकांत सुपे यांनी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी बारकाईने केलेल्या तपासणीत ३८ कोटी ७५ लाख २० हजार ६४१ रुपयांचा आर्थिक घोटाळा उजेडात आणला होता. त्यांनी घोटाळ्याची तक्रार गुन्हे शाखेत नोंदविली. या आधारावर चौकशी अधिकारी निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी धंतोली पोलीस ठाण्यात फसवणूक, एमपीआयडी, आयटी कायदा, गुन्हेगारी षड्यंत्राचा गुन्हा नोंदवला.चार वर्षें चौकशीसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ष २०१५ मध्ये पहिल्यांदा आर्थिक गुन्हे शाखेत घोटाळ्याची तक्रार केली होती. पण गुन्हे शाखेने त्यावर काहीच कारवाई केली नाही. याचप्रकारे धंतोली पोलीस ठाण्यातही तक्रार नोंदवली होती. धंतोली पोलिसांनी थातूरमातूर चौकशी केल्यानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपविले होते. चार वर्षांनंतरही कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे घोटाळ्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.८० पेक्षा जास्त आरोपीघोटाळ्यात बँकेचे पदाधिकारी, संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्जदारांसह ८० पेक्षा जास्त लोक सहभागी आहेत. सर्वजण मालामाल झाले आहेत. कर्ज थकीत असतानाही अनेक कर्जदारांनी बँकेने मुक्त केलेल्या संपत्तीची विक्री केली आहे. यामध्ये शहरातील चर्चित बिल्डर आणि व्यापाऱ्यांचा समावेश आहे. बँकेने दुसऱ्या बँकेच्या अनेक थकबाकीदारांनाही कर्ज मंजूर केले आहे. या प्रकरणाचा बारकाईने तपास केल्यास शहरातील अनेक मान्यवरांवर तुरुंगात जाण्याची वेळ येणार आहे.आर्थिक घोटाळ्याची भरमारआर्थिक घोटाळ्यासाठी चर्चित उपराजधानीत आणखी एक नाव जोडले आहे. आतापर्यंत कळमना सोसायटी, वासनकर इन्व्हेंटमेंट, श्रीसूर्या, झामरे, श्रीराम पत संस्था आदींचे घोटाळे चर्चेत होते. श्रीराम पत संस्थेतील आर्थिक घोटाळ्याचे प्रकरण दोन महिन्यापासून कोतवाली पोलीस ठाण्यात प्रलंबित आहेत. ठेवीदार आणि खातेदारांनी अध्यक्षाच्या घराला घेराव केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अजूनही कारवाई केलेली नाही. पोलीस घोटाळे करणाऱ्यांना साथ देत असल्याचा ठेवीदारांचा आरोप आहे. निरंतर होणाऱ्या आर्थिक घोटाळ्यामुळे शहराचे नाव बदनाम झाले आहे. बुधवारी ताज्या प्रकरणाची पोलिसात नोंद झाल्यामुळे नवोदय बँकेच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजी