लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुगंधित द्रव्य (अत्तर) बनवण्याच्या उद्योगात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून रेल्वेच्या कर्मचाऱ्यास ३.६३ लाखाने फसवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.फिर्यादी ओमप्रकाश साहू रा. यादवनगर हे रेल्वेत लोको पायलट आहेत. पोलीस सूत्रानुसार ६ मे रोजी रुची राणा आणि आशुतोष राणा यांनी साहू यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्यांना मनी डिझायनिंग रिसर्च कंपनीच्या माध्यमातून उद्योग करण्याचे आमिष दाखविले. या कंपनीच्या माध्यमातून सुगंधित द्रव्य (अत्तर) बनविण्याच्या उद्योगात गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यांनी साहू यांना सांगितले की, अत्तर बनविण्यासाठी विशेष प्रकारचे गवत उगवावे लागते. यात गुंतवणूक केल्यास प्रचंड नफा मिळतो. यासाठी साहू यांना ५० हजार रुपये डेबिट कार्डने ट्रान्सफर करण्यास सांगितले. ही रक्कम ट्रान्सफर करताच मोठ्या प्रमाणावर नफा झाल्याचे सांगून अधिक राशी गुंतवणूक करण्यास सांगितले. आरोपींनीसांगितल्यानुसार साहू गुंतवणूक करण्यास तयार झाले. नेट बँकिंगच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात पैसे जमा केले. यानंतर ते नफा मिळण्याची वाट पाहू लागले. अनेक दिवस लोटल्यानंतरही आरोपीकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने साहू यांना संशय आला. आरोपींनी त्यांच्याशी बोलणेही बंद केले. अखेर साहू यांनी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली.
नागपुरात गुंतवणुकीच्या नावावर ३.६३ लाखांनी फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:53 IST
सुगंधित द्रव्य (अत्तर) बनवण्याच्या उद्योगात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून रेल्वेच्या कर्मचाऱ्यास ३.६३ लाखाने फसवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
नागपुरात गुंतवणुकीच्या नावावर ३.६३ लाखांनी फसवणूक
ठळक मुद्देअत्तर उद्योगात गुंतवणूक करण्याचे आमिष