शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बोनस मिळवण्यासाठी गमावले २४ लाख रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:12 IST

विमा पॉलिसीवर ‘बोनस’ मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त महिला प्राचार्यांची सायबर गुन्हेगारांनी २४.३८ लाखाने फसवणूक केली. गेल्या सात महिन्यांपासून आरोपी सांगत असलेल्या खात्यात पैसे जमा केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. तरुणक्रांती महापात्रा (६३) रा. रामनगर असे तक्रारकर्त्याचे नाव आहे.

ठळक मुद्देसेवानिवृत्त महिला प्राचार्यांची फसवणूक : सायबर गुन्हेगारांचे कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विमा पॉलिसीवर ‘बोनस’ मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त महिला प्राचार्यांची सायबर गुन्हेगारांनी २४.३८ लाखाने फसवणूक केली. गेल्या सात महिन्यांपासून आरोपी सांगत असलेल्या खात्यात पैसे जमा केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. तरुणक्रांती महापात्रा (६३) रा. रामनगर असे तक्रारकर्त्याचे नाव आहे.महापात्रा या सेवानिवृत्त प्राचार्य आहेत. पोलीस सूत्रानुसार, महापात्रा यांनी काही दिवसांपूर्वी एचडीएफसी बँकेची विमा पॉलिसी काढली होती. २१ सप्टेंबर २०१७ रोजी त्यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. एचडीएफसीचा अधिकारी बोलत असल्याचे त्याने सांगितले. त्यांच्या पॉलिसीवर अतिरिक्त बोनस देण्याचे त्याने आमिष दाखविले. त्याने महापात्रा यांना सांगितले की, २८ हजार रुपये जमा केल्यावर त्यांना दीड लाख रुपयाचा अतिरिक्त बोनस मिळेल. केवळ दोन महिन्यांपूर्वी काढण्यात आलेल्या पॉलिसीवर दीड लाख रुपये बोनस मिळणार असल्याच्या आमिषात त्या आल्या. त्यामुळे त्यांनी आरोपीने सांगितल्यानुसार पैसे जमा केले. त्यानंतर महापात्रा यांना वेगवेगळ्या नंबरवरून महिला-पुरुष फोन करून त्यांना आपल्या जाळ्यात ओढत राहिले. बोनसचे आमिष दाखवीत वेगवेगळ्या खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. महापात्रा यांनीही ते सांगत त्या खात्यात पैसे जमा करीत राहिल्या. यासाठी त्यांनी दोनवेळा कर्जही घेतले. एप्रिल महिन्यात त्यांनी आणखी पैसे जमा करण्यास असमर्थता दर्शविली. यानंतर त्यांनी सांगितले की, त्यांना गुन्हे शाखा पोलिसांनी पकडले असून इतके मोठी रक्कम कुठून आली, याबाबत ते विचारत आहेत तसेच कारवाईची धमकीही देत आहेत. तुमचे नाव सांगितले तर ते तुम्हालाही विचारपूस करण्यासाठी बोलावतील. तुमचे वय पाहता आम्ही तुमचे नाव सांगितले नाही, असे म्हणत गुन्हे शाखेचे पोलीस पाच लाख रुपये मागत आहेत. त्यांच्याकडे साडेतीन लाख रुपये आहेत. दीड लाख रुपये तुम्ही द्या, असे आरोपीने सांगितले. ही रक्कम जमा केल्यानंतर महापात्रा यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.महापात्रा यांची मुले विदेशात राहतात. त्यांची मुलगी अमेरिकेतून आल्यानंतर त्यांनी तिला आपबिती सांगितली. मुलीने सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास सायबर सेलचे निरीक्षक पिंदूरकर आणि विजय खरे करीत आहेत.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमnagpurनागपूर