शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

२० लाख कोटींच्या पॅकेजचा उद्योगांना फायदा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 07:00 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड लॉकडाऊननंतर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. पण त्याचा उद्योगधंदे व व्यापार व्यवसायाला फारसा फायदा होण्याची शक्यता नाही.

सोपान पांढरीपांडेनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड लॉकडाऊननंतर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. पण त्याचा उद्योगधंदे व व्यापार व्यवसायाला फारसा फायदा होण्याची शक्यता नाही.याचे कारण म्हणजे कोविडच्या पॅकेजमध्ये वस्तू व उत्पादनांची मागणी वाढविण्यासाठी कुठलीही ठोस उपाययोजना नाही. देशातील औद्योगिक उत्पादनांपैकी ६० टक्के उत्पादन देशातच विकले जाते. परंतु लॉकडाऊनच्या ५०-५५ दिवसांच्या काळात १४ कोटी व्यक्तींचे रोजगार/नोकऱ्या संपल्याने नवीन वस्तू किंवा उत्पादने खरेदी करण्यासाठी देशात पोषक वातावरण नाही व ते निर्माण करण्यासाठी पॅकेजमध्येही उपाययोजना नाहीत.

रोजगार निर्मितीसाठी काही नाहीया पॅकेजमध्ये १४ कोटी व्यक्तींना परत रोजगार देण्याचे धोरण नाही व उपाययोजनाही नाहीत. त्याचबरोबर रोजंदारीने काम करणाºया श्रमिक वर्गासाठीही उपाययोजना नाहीत. केवळ शहरे सोडून परत आलेल्या प्रवासी मजूरांना त्यांच्या गावातच काम देण्यासाठी मनरेगाचे अर्थसंकल्पीय अनुदान ४० हजार कोटींनी वाढविले आहे. त्यामुळे गावात रोजगार निर्माण होईलही पण शहरात औद्योगिक कामगार/कर्मचारी, बांधकाम मजूर यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. याने अर्थव्यवस्थेला परत चालना कशी मिळेल, हा मोठा प्रश्न आहे.मोदींच्या या पॅकेजमध्ये अनेक विरोधाभासी उपाययोजनासुद्धा आहेत. उदा. कोळसा व खनिज उद्योगांचे ४०-४५ वर्षांपूर्वी राष्ट्रीयीकरण झाले होते. ते रद्द करून खासगी व सरकारी अशा दोन्ही कंपन्यांना प्रवेश देण्याची योजना आहे. यापूर्वी कोळसा व विमानन क्षेत्रात हा प्रयोग फसलेला असताना सरकार ते पुन्हा का करते आहे, हे अनाकलनीय आहे.थकीत कर्जाचे काय?केवळ १२ सरकारी बँकांचे थकीत कर्ज १० लाख कोटींवर पोहोचले असताना विनातारण कर्जासाठी ३ लाख कोटी, गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांना नवे कर्ज देण्याची योजना आहे. परंतु विरोधाभास म्हणजे पूर्वी १ लाख कर्जाचे हप्ते थकले तर ‘डिफॉल्ट’ मानला जायचा. आता ही मर्यादा १ कोटीवर नेली आहे. शिवाय ६ महिन्यांच्या डिफॉल्टसाठी दिवाळखोरी व नादारी कायद्याखाली (आयबीसी) कारवाई होत असे. ती मुदत एक वर्ष झाली आहे. हा थकीत कर्ज वसूल करायचा प्रयत्न आहे की कर्ज वसुली न होण्यास प्रोत्साहन देणारा प्रकारा प्रकार आहे, हे वाचकांनीच ठरवावे.अशा विरोधाभासी योजनांमुळे मोदींच्या या पॅकेजमुळे अर्थव्यवस्थेला बळ मिळण्याऐवजी ती दुर्बल होण्याची शक्यता अधिक आहे आणि व्यापाऱ्यांचा याचा अचूक अंदाज आल्यामुळेच शेअर बाजार आज कोसळले आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी ३१४ अंकांनी तर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १०६९ अंकानी घसरले आहेत. याचे हेच कारण आहे.

 

टॅग्स :businessव्यवसाय