शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात १८८ कोटी रुपयांचा संरक्षण हब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 03:32 IST

नागपुरातील मिहान प्रकल्पात २० एकरावर टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या सहकार्याने संरक्षण सामग्री निर्मितीचा हब उभा करण्यासाठी विदर्भ उद्योग संघटनेशी (व्हीआयए) राज्य सरकारने सोमवारी करार केला.

मुंबई : नागपुरातील मिहान प्रकल्पात २० एकरावर टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या सहकार्याने संरक्षण सामग्री निर्मितीचा हब उभा करण्यासाठी विदर्भ उद्योग संघटनेशी (व्हीआयए) राज्य सरकारने सोमवारी करार केला. या प्रकल्पात सुमारे १८८ कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.राज्यात संरक्षण व हवाई क्षेत्राशी संबंधित उद्योग मेक इन इंडिया अंतर्गत उभे करण्यासाठी राज्य सरकारने मागील आठवड्यातच यासंबंधीचे विशेष धोरण तयार केले आहे. नागपूर, नाशिक, पुणे, औरंगाबाद व अहमदनगर येथे संरक्षण हब उभे करण्यात येणार आहेत.नागपुरातील मिहान प्रकल्पात २० एकरावर संरक्षण सामग्री निर्मितीचा हब उभा करण्यासाठी व्हीआयएद्वारे संरक्षण उद्योग संघटना (डीआयआयए) कार्यरत होती. या दोघांच्या प्रयत्नातून टाटा टेक्नॉलॉजी हा हब उभा करण्यासाठी समोर आले आहे. सोमवारी झालेल्या सामंजस्य करारात टाटा या प्रकल्पासाठी २० एकरावर १८८ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यासाठी विदर्भ डिफेन्स हब अ‍ॅण्ड इंडस्ट्रीअल क्लस्टरची स्थापना करण्यात आली आहे.मिहानमधील या प्रकल्पात टाटा टेक सुविधा केंद्राची उभारणी केली जाईल. त्याअंतर्गत सर्वांत आधी संरक्षण सामग्री उत्पादनासाठी लागणाºया मनुष्यबळाची निर्मिती केली जाईल. त्यानंतर टाटांकडून सुविधांची उभारणी होईल. सुविधा उभारणीनंतर संरक्षण उत्पादन करणाºया कंपन्या या क्लस्टरमध्ये गुंतवणूक करतील, अशी योजना आखण्यात आली आहे.देशाच्या आयुधांचे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल रवींद्र थोडगे हे या क्लस्टरचे अध्यक्ष आहेत. आॅटो क्षेत्राचा २० वर्षे अनुभव असलेले हर्ष गुणे हे सीईओ आहेत.तोफखाना विभागातील निवृत्त अधिकारी मेजर जनरल अनिल बाम, डीआयआयएचे दुष्यंत देशपांडे व व्हीआयएचे सचिव सुहास बुधे यांचा यामध्ये सहभाग आहे. व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे यांनीही या करारासाठी विशेष मेहनत घेतली.नागपूर व अमरावतीत ‘स्कील सेंटर’याच संरक्षण उत्पादन हबचा एक भाग म्हणून नागपूर व अमरावतीतील युवकांना संरक्षण आणि हवाई क्षेत्रातील प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. हा हब मिहानमध्ये उभा होईपर्यंत तेथील कंपन्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी या दोन ठिकाणी ‘उडान’ हे कौशल्य विकास केंद्रही उभे केले जाणार आहे. टाटा टेक्नॉलॉजीकडूनच यासाठी प्रत्येकी ३० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.या दोन्ही केंद्रांद्वारे दरवर्षी ६ हजार युवक संरक्षण व हवाई क्षेत्रासाठी तयार केले जाणार आहेत. त्यासाठीचा करारही या परिषदेत सोमवारी झाला.संरक्षण सामग्री उत्पादनासाठी चौफेर नियोजनाची गरज असते.या क्षेत्रात सर्वसमावेश कौशल्याची गरज असते. यासाठीच हे केंद्र उभे करताना इंजिनीअरिंग, आॅटोमोबाइल, एअरोस्पेस आणि स्फोटके या चार क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाईल. धोरणांतर्गत राज्यातील पहिला हब उभा होईल.- लेफ्टनंट जन. रवी थोडगे (निवृत्त) अध्यक्ष, विदर्भ डिफेन्स हब अ‍ॅण्ड इंडस्ट्रीअल क्लस्टर