शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

रिपाइं एकीकरण फसलेला प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 00:47 IST

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या विविध गटांनी एकत्रित येऊन एकीकरण करण्याचा प्रयोग हा सपशेल फसलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकीकरणाच्या मागे न लागता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा एकच पक्ष असावा आणि त्यात सर्वांनीच सामील व्हावे, असे मत रिपाइं मुक्ती आंदोलनाचे मुख्य संयोजक रमेश जीवने यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देरमेश जीवने : एकच पक्ष असावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या विविध गटांनी एकत्रित येऊन एकीकरण करण्याचा प्रयोग हा सपशेल फसलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकीकरणाच्या मागे न लागता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा एकच पक्ष असावा आणि त्यात सर्वांनीच सामील व्हावे, असे मत रिपाइं मुक्ती आंदोलनाचे मुख्य संयोजक रमेश जीवने यांनी व्यक्त केले.रिपाइं मुक्ती आंदोलन या अभियानांतर्गत सोमवारी आमदार निवास येथे रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीत कार्यरत असलेल्या विविध कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यात उपरोक्त विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. यानंतर लोकमतशी बोलताना जीवने यांनी सांगितले की, एकीकरण हा फसलेला प्रयोग आहे. तेव्हा आता एकच पक्ष हाच महत्त्वाचा आहे. त्यादिशेने आम्ही काम करीत आहोत. विविध गटांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी चर्चा केली जात आहे. या अंतर्गतच आजची बैठकही बोलावण्यात आली होती. त्यात केवळ प्रतिनिधिक स्वरुपात पदाधिकाऱ्यांनाच आमंत्रित करण्यात आले होते.रंजना वासे यांच्या अध्यक्षतेखली बैठक पार पडली. यावेळी निमंत्रक अशोक मेश्राम, अमित भालेराव, प्रशिक आनंद, सीमा अलोने, क्षितिज गायकवाड, श्रीकांत ओगले, राहुल जारोंडे, जयबुद्ध लोहकरे, राजदीप नगरारे आदी उपस्थित होते.गवई यांच्या पक्षात सर्व गट विसर्जित व्हावेसध्या नेमका कोणता रिपब्लिकन पक्ष खरा आहे, अशी विचारणा केली असता रमेश जीवने यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुºया पत्रावर आधारित ज्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया या पक्षाची स्थापना करण्यात आली होती. त्याचे पहिले अध्यक्ष एन. शिवराज, दुसरे अध्यक्ष दादासाहेब गायकवाड, तिसरे अध्यक्ष रा.सू. गवई आणि सध्या कर्नाटकचे माजी आमदार एन. राजेंद्रन हे अध्यक्ष आहेत. तर डॉ. राजेंद्र गवई हे सरचिटणीस आहेत. हा पक्षच खरा असून या पक्षातच सर्व गट विसर्जित व्हावे. परंतु या पक्षाचे नेतृत्व करणाºयांनीही पक्षाला बंदिस्त करून ठेवता कामा नये. ते समाजासाठी खुले करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

 

टॅग्स :Politicsराजकारणnagpurनागपूर