शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅटफॉर्मवर चोरी करणाऱ्या छिंदवाड्यातील आरोपीला आरपीएफने ठोकल्या बेड्या

By नरेश डोंगरे | Updated: March 9, 2024 13:49 IST

रेल्वे स्थानकावर गर्दीत हात चलाखी करणाऱ्या आरोपींची संख्या सारखी वाढतच आहे. शुक्रवारी अशाच प्रकारे हातचलाखी दाखवणाऱ्या एका छिंदवाड्यातील आरोपीला आरपीएफच्या जवानांनी बेड्या ठोकल्या.

नरेश डोंगरे 

नागपूर : रेल्वे स्थानकावर गर्दीत हात चलाखी करणाऱ्या आरोपींची संख्या सारखी वाढतच आहे. शुक्रवारी अशाच प्रकारे हातचलाखी दाखवणाऱ्या एका छिंदवाड्यातील आरोपीला आरपीएफच्या जवानांनी बेड्या ठोकल्या.

कलीराम मनकु मसराम (वय ४०) असे या भामट्याचे नाव असून तो छिंदवाडा जिल्ह्यातील पतलून, चौरई येथील रहिवासी आहे.मंगलगाव, चिमूर येथील रहिवासी मुकेश सुरेश खेडकर (वय २७) शुक्रवारी नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वर उभे असताना तेथे झालेल्या गर्दीचा गैरफायदा उठवत आरोपी कलीराम यांनी मुकेशच्या खिशातील पैशाचे पाकीट लांबविले. ते लक्षात आल्यानंतर अडीच हजार रुपये, आधारकार्ड आणि महत्त्वाचे कागदपत्र चोरीला गेल्याची तक्रार मुकेशने रेल्वे पोलीस ठाण्यात नोंदवली. रेल्वे पोलिसांकडून ही माहिती आरपीएफला देण्यात आली आणि आरोपीची चौकशी सुरू करण्यात आली.  फलाट क्रमांक ८ वरील सीसीटीव्हीचे फुटेज पाहून आरपीएफ चे पीएसआय सिताराम जाट, हवालदार कपिलझरबडे तसेच आरक्षक देवेंद्र पाटील यांनी परिसरात पाहणी सुरू केली. सायंकाळी ५.३० च्या सुमारास त्यांना मुंबई रेल्वे लाईनच्या टोकावर आरोपी कलीराम संशयास्पद अवस्थेत दिसला. त्यांनी त्याला तब्येत घेऊन आरपीएफ च्या ठाण्यात आणले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे मुकेश यांचे पाकीट, आधार कार्ड आणि फोटो आढळले. पोलीस निरीक्षक मीना यांनी आरोपीकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे मुकेशला बोलवून ते पाकीट रक्कम आणि त्यातील आधार कार्ड व फोटो त्याचेच आहे का, याची शहानिशा करण्यात आली. मुकेशने संशयित आरोपीचा चेहरा ओळखला. त्यानंतर कलीराम जवळचा मुद्देमाल जप्त करून त्याला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

परप्रांतीय भामट्यांचा सुळसुळाट 

नागपूर रेल्वे स्थानकावर २४ तास प्रवाशांची वर्दळ असते. खास करून गाडीत चढताना किंवा उतरताना प्रवाशांची मोठी गर्दी होते. ती संधी साधून त्यांच्या जवळची रक्कम, दागिने किंवा मोबाईल सारख्याच वस्तू लंपास करण्यासाठी नागपुरात मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि अन्य प्रांतातील गुन्हेगार तसेच नागपूरच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातील भामटे  रेल्वे स्थानक आणि परिसरात घुटमळत असतात. अलीकडे अशा भामट्यांचा सुळसुळाट झाल्याचे वारंवार होणाऱ्या घटनेतून उघडकीस येत आहे.