शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हा मार्ग धोक्याचा आहे! कळमेश्वर-काटोल-नागपूर मार्ग झाला खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 21:50 IST

व्हीआयपी रोड समजला जाणारा नागपूर-कळमेश्वर-काटोल मार्ग सध्या धोक्याचा झाला आहे. या मार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे हे अपघाताला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करण्याचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार पुढाकार घेईल का, असा सवाल नागरिकाकडून केला जात आहे.

ठळक मुद्देअपघात वाढले, कोण घेणार दखल?

आशिष सौदागर/लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर (कळमेश्वर) : व्हीआयपी रोड समजला जाणारा नागपूर-कळमेश्वर-काटोल मार्ग सध्या धोक्याचा झाला आहे. या मार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे हे अपघाताला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करण्याचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार पुढाकार घेईल का, असा सवाल नागरिकाकडून केला जात आहे.जिल्ह्यातील महत्त्वाच्या तालुक्यांना जोडणारा हा मार्ग असून कळमेश्वर, काटोल, नरखेड ते वरुड तालुक्यापर्यंतच्या वाहतुकीचा दुवा म्हणून ओळखला जातो. या मार्गावरील वाढती वाहतूक व औद्योगिकीकरण, शिक्षण झोन लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाचे तातडीने नुतनीकरण करणे गरजेचे होते. नागपूर शहरातील जुन्या काटोल रोड नाक्यापासून ते कळमेश्वर न.प.च्या हद्दीपर्यंत या मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. याच १५ कि.मी.च्या अंतरात अनेक शाळा, महाविद्यालये, मोठ्या शैक्षणिक संस्था, दोन धार्मिक स्थळे आहे. त्यामुळे येथे सकाळी ९ ते रात्री ९ या काळात वाहतूक अधिक असते. रस्त्यात साधा अपघात झाला तर जाम लागतो.पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचत असल्याने जड वाहनामुळे या मार्गावरील डांबर उखडत चालले आहे. गत आठ वर्षात या मार्गावर अनेक जणांचा बळी गेला. या मार्गाचे रुंदीकरण करण्याची गत पाच वर्षापासून मागणी आहे. मात्र कुणीही हा विषय गांभीर्याने घेतला नाही.राज्याचे गृृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघा पर्यंत हा मार्ग जातो. यासोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सुद्धा धापेवाडा येथे जाताना याच मार्गावरून जावे लागते. यासोबतच पशुसंवर्धन मंत्री केदार यांना नागपूर येथून कळमेश्वर (मतदारसंघ) येथे जाता या मार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे तीन महत्त्वाचे मंत्री या मार्गावरून नेहमी जात असताना या मार्गाचे रुंदीकरण किंवा किमान व्यवस्थित डागडुजी करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला रस का नाही,  हाही एक प्रश्नच आहे. मधल्या काळात गडकरी यांनी या मार्गाच्या सिमेंटीकरणासाठी पुढाकार घेतला होता. मात्र या कामाला फारसा वेग आला नाही.नागपूर-कळमेश्वर मार्गाने गत दहा वर्षात वाहतूक वाढली आहे. मात्र मार्गाची रुंदी आहे तीच आहे. त्यामुळे अपघात वाढले आहे. फेटरी परिसरात अपघाताचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सरकारने नागरिकांचा प्रवास सुखकर करण्यासाठी या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करावे.- धनश्री मुकेश ढोमणे, सरपंच फेटरी

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाnagpurनागपूर