शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

नागपूरच्या आमदार निवासातील विलगीकरण कक्षाच्या खोल्या अस्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 23:46 IST

आमदार निवासाच्या विलगीकरण कक्षात अस्वच्छता, उशीचे मळकट कव्हर, रक्ताचे डाग असलेले टॉवेल, सफाईचा अभाव असलेले स्वच्छतागृह, खिडक्यांवर धूळ व लिफ्टमध्ये खऱ्र्याच्या पिचकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होताच खळबळ उडाली.

ठळक मुद्देरक्ताने माखलेले टॉवेल, घाणेरड्या शौचालयाचा व्हिडिओ व्हायरल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आमदार निवासाच्या विलगीकरण कक्षात अस्वच्छता, उशीचे मळकट कव्हर, रक्ताचे डाग असलेले टॉवेल, सफाईचा अभाव असलेले स्वच्छतागृह, खिडक्यांवर धूळ व लिफ्टमध्ये खऱ्र्याच्या पिचकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होताच खळबळ उडाली. याची दखल स्वत: विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी घेतली. त्यांनी बांधकाम विभागाला स्वच्छतेकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोहा आणि शारजा येथून येणाºया प्रवांशांची थर्मल स्क्रिनिंग करून आमदार निवासात सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात ठेवले जाते. यात ६० वर्षांवरील वयोगटातील प्रवाशांना पुढील १४ दिवस येथेच ठेवण्यात येते. तर या वयोगटापेक्षा कमी प्रवासू जे नागपूरवासी आहेत त्यांना २४ तास ठेवल्यानंतर व कुठलीही लक्षणे आढळून न आल्यास सुटी देऊन घरीच थांबण्याचा सल्ला दिला जाते. कुठल्या प्रवाशाला ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे आढळल्यास मेयो, मेडिकलमध्ये पाठविले जाते. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाºया आमदार निवासात या प्रवाशांसाठी इमारत क्र. १ येथे १५० तर इमारत क्र. २ मध्ये ५० खोल्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. रविवारी इमारत क्र. १ येथे ८७ प्रवाशांना थांबविण्यात आले होते. यातील एका प्रवाशाने खोली क्र. ४५८मधील अस्वच्छतेचा व्हिडिओ बनविला. यात बेडशीटवर डाग, खिडक्यांवर साचलेली धूळ, अस्वच्छ शौचालय, लिफ्टमध्ये पान-खऱ्र्यांच्या पिचकाऱ्या तर दुसऱ्या एका खोलीत रक्ताने माखलेले टॉवेल्स, उशांचे कव्हरचे फोटो व्हायरल केले. या फोटो आणि व्हिडिओची गंभीर दखल विभागीय आयुक्तांनी घेतली. त्यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला जाबही विचारल्याचे समजते. या व्हिडिओने आमदार निवसातील अस्वच्छता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.स्वच्छतेकडे आणखी लक्ष देणारआमदार निवासाची जबाबदारी असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता लक्ष्मीकांत राऊळकर यांनी सागितले, खोली रिकामी होताच महानगरपालिकेकडून फवारणी करून साफसफाई केली जाते. निर्जंतुकीकरण केलेले टॉवेलपासून ते बेडशीट टाकली जाते. प्रवाशांना कुठलीही अडचण होऊ नये याकडे विशेष लक्ष दिले जाते. प्रवाशाच्या तक्रारीची दखल घेऊन सफाईकडे आणखी लक्ष दिले जात आहे. विशेष म्हणजे, आमदार निवासातील विलगीकरण कक्षाची स्तुती करणारे काही प्रवाशांचे व्हिडिओही आमच्याकडे आहेत, असेही ते म्हणाले.पालकमंत्र्यांनी घेतली गंभीर दखलदरम्यान पालकमंत्री नितीन राऊत यांनी याची गंभीर दखल घेतली. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कोरोनासंबंधीच्या बैठकीत त्यांनी हा विषय आवर्जून काढत आमदार निवास येथे सुरू असलेल्या विलगीकरण केंद्रात स्वच्छतेसह आवश्यक सुविधा तात्काळ पुरविण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMLA Hostelआमदार निवास