शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

संघाची भूमिका, बाबासाहेब ‘अंत्योदय’चे जनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 23:43 IST

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सुविधा, प्रगतीचा लाभ पोहोचला पाहिजे ही ‘अंत्योदय’ची संकल्पना आहे. भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारकडून ‘अंत्योदय’ योजनेला पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्यात आले. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र ‘अंत्योदय’चे जनक खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच असल्याची भूमिका मांडली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करत संघातर्फे शब्दांजलीदेखील अर्पण करण्यात आली.

ठळक मुद्देमहापरिनिर्वाणदिनी अभिवादन : त्यांच्यासारखेच आज देशाला नेते हवेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सुविधा, प्रगतीचा लाभ पोहोचला पाहिजे ही ‘अंत्योदय’ची संकल्पना आहे. भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारकडून ‘अंत्योदय’ योजनेला पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्यात आले. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र ‘अंत्योदय’चे जनक खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच असल्याची भूमिका मांडली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करत संघातर्फे शब्दांजलीदेखील अर्पण करण्यात आली.संघाच्या अधिकृत ‘फेसबुक पेज’वर ही भूमिका मांडण्यात आली आहे. डॉ. आंबेडकर यांना केवळ संविधाननिर्माते या चौकटीत बसवणे अयोग्य ठरेल. त्यांनी युगान्युगे जाती व वर्ण व्यवस्थेच्या जोखडात फसलेल्या भारताला याबाबत विचार करायला भाग पाडले. ते महान शिक्षक, अर्थतज्ज्ञ, वक्ता, द्रष्टे नेता होते. शालेय जीवनात त्यांना सर्व प्रकारच्या भेदभावांचा सामना करावा लागता. मात्र त्यांनी दृढनिष्ठा ठेवली व ते स्वनिर्मित व्यक्तिमत्त्वाचे आदर्श उदाहरण बनले. भारतात समानता यावी यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. तत्कालीन भारतातील अस्पृश्य व वंचितांची स्थिती लक्षात घेता त्यांनी आरक्षणाची व्यवस्था तयार केली. सोबतच त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठीदेखील कार्य केले, असे संघाने अभिवादन करताना म्हटले आहे.बाबासाहेब राष्ट्रनिर्माता होतेडॉ.बाबासाहेब आंबेडकर हे वास्तविकपणे केवळ दलित नेतेच नव्हते, तर राष्ट्रनिर्माता व जागतिक नेते होते. त्यांनीच सामाजिक न्यायाचे सिद्धांत दिले. भारत निर्माणाची सुरुवात करणाऱ्यांमध्ये बाबासाहेबांचे मौलिक योगदान होते. आजच्या युगात त्यांच्या विचार अंगिकारण्याची आवश्यकता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जागतिक पातळीवर भारताच्या प्रगतीसाठी डॉ.आंबेडकर यांच्यासारख्या महान नेत्यांची आवश्यकता असल्याचे मत संघातर्फे मांडण्यात आले आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ