शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

रोडगा; अमरावती जिल्ह्यातील बहिरम यात्रेने राखलेले संस्कृतीचे संचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 15:35 IST

देवीच्या भारूडात भवानी आई रोडगा वाहीन तुला, अशी जी आळवणी केली जाते त्यातील रोडगा हा पदार्थ वऱ्हाडातील ग्रामीण जीवनाचा एक अविभाज्य अंग मानला जातो.

ठळक मुद्देविदर्भात रोडगा, राजस्थानात दालबाटी आणि बिहारात लिट्टी चोखा

वर्षा बाशूलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: देवीच्या भारूडात भवानी आई रोडगा वाहीन तुला, अशी जी आळवणी केली जाते त्यातील रोडगा हा पदार्थ वऱ्हाडातील ग्रामीण जीवनाचा एक अविभाज्य अंग मानला जातो. तसंही आपल्या देशातील एका प्रांतात विशिष्ट पद्धतीने बनविलेला पदार्थ हा दुसऱ्या प्रांतातही थोड्याफार फरकाने बनविला जात असल्याचे आपण पाहतो. जसे, महाराष्ट्रातील पुरणपोळी आंध्रात बुरेलू नावाने तळल्या जाणाऱ्या गोड बोंडाच्या रुपात पहायला मिळते किंवा दिवाळीचा दिमाखदार अनरसा तामिळनाडूसह अन्य दाक्षिणात्य राज्यांत अद्दरस्सम नावाने काळे तीळ लावून आवडीने चाखला जातो. रोडगाही याला अपवाद नाही.विदर्भ-वऱ्हाडात ज्याला आपण रोडगा म्हणतो, तोच राजस्थानात गेला की तेलातुपात घोळून दालबाटी होतो आणि बिहारात गेला की वांग्याच्या भरीतासोबत खाल्ल्या जाणाऱ्या सत्तूच्या पीठाने बनविलेला, लिट्टी चोखा होतो.प्राचीन काळात युद्धावर निघालेल्या सैनिकांनी कदाचित हा पदार्थ प्रथम तयार केला असावा किंवा देशाटनाला जाणाऱ्या व्यापाऱ्यांच्या खाद्यकल्पनेचा तो अविष्कार असावा असे वाटते.अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार व परतवाडा तालुक्यांदरम्यान असलेल्या बहिरम या धार्मिक स्थळावर या रोडग्याचे महत्त्व अधोरेखित होते. बहिरमच्या यात्रेला जाणे म्हणजे रोडगा व वांग्याची तिखट, चमचमीत भाजी खाणे हे प्रसाद ग्रहणाएवढेच महत्त्वपूर्ण असते.रोडगा म्हणजे कणकेच्या जाड पोळ्याचे एकावर एक जाड थर लावून ती गुंडाळी गोवऱ्यांवर भाजून बनवलेला पदार्थ होय. रोडगा हा लहान मोठ्या अशा दोन आकारात बघायला मिळतो. काही रोडगे हे छोट्याशा गोळ्याच्या स्वरुपातले तर काही भल्या थोरल्या आकारातले. रोडगा बनवण्याचे काम प्रामुख्याने पुरुषांचेच. रोडग्यासाठी लागणारे गव्हाचे पीठ हे जाडसरच असायला हवे. त्यात ओवा, तीळ व तेल टाकून ते भिजवले जाते. त्याच्या जाडसर पोळ्या लाटून त्या पोळांना एकमेकांवर रचून त्याचा पुन्हा गोळा तयार केला जातो. हा गोळा मग गोवऱ्यांवर ठेवून भाजला जातो. भाजलेले रोडगे एका पोत्यात ठेवून रगडले की त्यावरची राख व माती निघून जाते. मग हा गरमागरम रोडगा फोडून त्याचा एकेक तुकडा पंगतीत वाढला जातो. रोडग्यासोबत वांग्याची भाजी असा निश्चित मेनू असतो. रोडगा तीन ते चार दिवस टिकणारा असल्याने तो प्रवासातही नेता येतो. काही सुगरणी रोडग्याच्या मधल्या भागाचा चुरा करून त्यात गूळ घालून त्याचे लाडूही बनवतात. असे हे रोडगे आणि आलूवांग्याचा रस्सा (खास वैदर्भीय शब्द) बहिरमच्या यात्रेत तात्पुरत्या उभारलेल्या एखाद्या राहुटीत बसून खाल्ले की आपण आपल्या संस्कृतीशी नाळ जोडून आहोत याचेही मग एक समाधान मिळवता येऊ शकते.

 

टॅग्स :Amravatiअमरावतीfoodअन्न