शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

शस्त्रक्रियांच्या मर्यादेवर रोबोटिक्सची मात : अभिनव देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:04 IST

मानवी हाताने करण्यात आलेल्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेला मर्यादा पडतात. मात्र रोबोटिक सर्जरीमुळे या मर्यादा गळून पडतात. ‘रोबोटिक्स आर्म’ ३६० डिग्री वळत असल्याने, १२ पटींनी दृश्यांसह व अचूकतेसह रोबोटिक सर्जरी करता येते, अशी माहिती कर्करोग व रोबोटिक्स शल्यचिकित्सक डॉ. अभिनव देशपांडे यांनी दिली.

ठळक मुद्देविज्ञान संस्कार शिबिरात व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानवी हाताने करण्यात आलेल्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेला मर्यादा पडतात. मात्र रोबोटिक सर्जरीमुळे या मर्यादा गळून पडतात. ‘रोबोटिक्स आर्म’ ३६० डिग्री वळत असल्याने, १२ पटींनी दृश्यांसह व अचूकतेसह रोबोटिक सर्जरी करता येते, अशी माहिती कर्करोग व रोबोटिक्स शल्यचिकित्सक डॉ. अभिनव देशपांडे यांनी दिली.विज्ञान भारतीद्वारे व नीरीच्या सहकार्याने नीरीच्या सभागृहात आठ दिवसीय ‘विज्ञान संस्कार शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. या विज्ञान संस्कार शिबिरामध्ये ‘कॅन रोबोट एंटर इन बॉडी अ‍ॅण्ड परफॉर्म ऑपरेशन’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी उपक्रमाच्या समन्वयिका वसुंधरा साठे विशेषत्वाने उपस्थित होत्या.रोबोटिक्स सर्जरीचा उगम कसा झाला हे सांगताना डॉ. अभिनव देशपांडे म्हणाले, युद्ध मैदानावरील रुग्णांपर्यंत डॉक्टर प्रत्यक्ष पोहचू शकत नसल्याने दुरवरून उपचार कसा होईल याचा विचार करताना अमेरिकेमध्ये रोबोटिक्स सर्जरीचा विचार करण्यात आला. यासंदभार्तील अभ्यास स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि नासा यांनी १९८० च्या दशकात केला व त्यामुळे रणमैदानावरील सैनिकांवर ‘टेलिप्रेजेंस’ म्हणजे दुरवरून रोबोट्सना आज्ञा करून प्रथमोपचार आणि अन्य छोट्या शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली, आणि त्यातून रोबोटिक्स सर्जरीचा उदय झाला.रोबोटिक सर्जरीची संकल्पना स्पष्ट करताना डॉ. देशपांडे म्हणाले की, हे रोबोट्स केवळ मानवाच्या हातचे बाहुले आहे. रोबोट्सना स्वत:ची बुद्धी नसते. त्यामागे शस्त्रक्रिया करणाऱ्या शल्यचिकित्सकाची बुद्धी आणि कौशल्य असते. रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे कमीत कमी चिरा दिला जातो. रुग्णाचे रक्त कमी जाते. यामुळे इस्पितळात कमी दिवस रहावे लागते. शस्त्रक्रियेत अचूकता येते. रोबोटिक्स आर्मला संवेदना जाणवत नाही, त्यामुळे फार अभ्यास करून शस्त्रक्रिया करावी लागते व यंत्र महागडे असल्याने सामान्यांच्या आवाक्यात नाही, अशा काही त्रुटी त्यांनी यावेळी सांगितल्या.दुसऱ्या सत्रामध्ये सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्याबद्दल व्हीएनआयटीचे प्रा. डॉ. कार्तिक बालसुंदन यांनी माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी नीरीच्या विविध प्रयोगशाळांना भेटी दिल्या. या शिबिरासाठी ३० शाळांमधील १६० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. उपक्रमासाठी वसुंधरा साठे, वैदेही साठे, सतीश घारे, देहाडकर, एस एस गड, अजित शुक्ला, गिरीश जोशी, डॉ रश्मी शुक्ला, देवशीष जोशी, आशिष जैन, सुयोग गुर्जर, रोहित गणोरकर, नरेश चाफेकर हे परिश्रम घेत आहेत. नीरीतर्फे आशिष शर्मा, डॉ राजेश बिनीवाले यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :Robotरोबोटtechnologyतंत्रज्ञानMedicalवैद्यकीय