शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात मेडिकलमध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 20:41 IST

स्वप्नवत वाटणारी रोबोटिक शल्यक्रिया आता नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) वर्षभरात सुरू होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतल्याने जिल्हा खनिज प्रतिष्ठान समितीने यंत्राच्या खरेदीसाठी १६ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचा पुढाकार : खनिकर्म विभागाची १६ कोटींच्या निधीला मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वप्नवत वाटणारी रोबोटिक शल्यक्रिया आता नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) वर्षभरात सुरू होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतल्याने जिल्हा खनिज प्रतिष्ठान समितीने यंत्राच्या खरेदीसाठी १६ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. यातील पहिल्या टप्प्यात १० टक्के निधी लवकरच मिळणार असून प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाल्यावर उर्वरित ९० टक्के निधी दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, निधी कमी पडल्यास उर्वरित दोन कोटीचा निधी उपलब्धही करून दिला जाणार आहे.मेडिकलच्या रुग्णांना रोबोटिकसारख्या उच्चप्रतिची सेवा देण्यासाठी शल्यक्रिया विभागाने पुढाकार घेतला आहे. या प्रस्तावाला गेल्या वर्षी जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली होती. यातील पहिल्या टप्प्यातील १६ कोटी ८० लाखांचा निधी जिल्हा वार्षिक योजनांतर्गंत खनिकर्म विभाग उपलब्ध करून देणार होते. यालाही शासनाने मंजुरी दिली. परंतु ३१ मार्च २०१९ पर्यंत पुनर्विनियोजनाद्वारे हा निधी प्राप्त न झाल्याने प्रशासकीय मान्यता आपोआप रद्द झाली. पालकमंत्री बावनकुळे यांनी मेडिकलमध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया सुरू करण्यासाठी पुन्हा प्रयत्न केले. यात जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या समितीने शस्त्रक्रियेला लागणाऱ्या रोबोटिक यंत्रांसाठी १६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. हा निधी कमी पडल्यास चार-पाच आरोग्य संस्था मिळून जिल्हा नियोजन समितीकडून दिल्या जाणाºया ३२ कोटींमधून दोन कोटीही उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे या वर्षभरात रोबोटिक शस्त्रक्रियेचा फायदा गरीब व सामान्य रुग्णांना होण्याची शक्यता आहे.-गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत यशस्वीतेचे प्रमाण वाढते, रोबोटिक तंत्रामुळे शस्त्रक्रियेदरम्यान स्नायूंची जास्त चिरफाड होत नाही. यामुळे वेदना कमी होतात. कमी प्रमाणात रक्त वाया जाते. मानवाच्या तुलनेत यांत्रिक रोबोट हा शरीरात ३६० डिग्रीपर्यंत फिरतो. त्यामुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीतेचे प्रमाण वाढते. यांत्रिकी पद्धतीने टाके लावण्याची प्रक्रिया सोपी होते. मेडिकलच्या बहुतांश लेप्रोस्कोपी पद्धतीच्या शस्त्रक्रिया यांत्रिकी पद्धतीने झाल्यास शस्त्रक्रियांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे.-केवळ ‘एम्स’मध्ये रोबोटिक सर्जरीभारतात सध्या सुमारे १०० शस्त्रक्रिया करणारे यांत्रिक रोबोट आहेत. यातील बहुतांश पुणे, मुंबई, हैद्राबाद, चेन्नई व दिल्लीच्या खासगी रुग्णालयांमध्ये आहे. शासकीय संस्थेपैकी केवळ ‘एम्स’मध्ये हा रोबोट उपलब्ध आहे. नागपूरच्या मेडिकलमध्ये हे यंत्र उपलब्ध झाल्यास याचा फायदा सर्वसामान्य रुग्णांना होऊ शकेल.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयguardian ministerपालक मंत्रीChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे