शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत चौकीदाराचे हात बांधून वाईन शॉपमध्ये चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 10:00 IST

चौकीदाराचे हात बांधून तुकडोजी चौकाजवळच्या एका वाईन शॉपचे शटर तोडून सशस्त्र चोरट्यांनी आतमधील मद्य लंपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र काऊंटर समोरच्या मजबूत लोखंडी गेटचे कुलूप तोडण्यात त्यांना यश आले नाही.

ठळक मुद्देमद्य हाती लागलेच नाही : चोरट्यांची निराशा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चौकीदाराचे हात बांधून तुकडोजी चौकाजवळच्या एका वाईन शॉपचे शटर तोडून सशस्त्र चोरट्यांनी आतमधील मद्य लंपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र काऊंटर समोरच्या मजबूत लोखंडी गेटचे कुलूप तोडण्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे त्यांना मद्याऐवजी तेथील काऊंटरमध्ये ठेवलेली ३ ते ४ हजारांची नाणी नेण्यावरच समाधान मानावे लागले. रविवारी पहाटे ३.१५ ते ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.तुकडोजी चौकाजवळ श्री प्रसाद वाईन शॉप आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सरकारने वाईन शॉप बंदीचे आदेश दिल्यापासून हे वाईन शॉपही बंदच आहे. वाईन शॉपच्या समोर एक वृद्ध चौकीदार रात्री झोपतो. रविवारी पहाटे ३.१५ च्या सुमारास एका आॅटोतून पाच सशस्त्र चोरटे आले. त्यांनी आॅटो दूरवर अंधारात उभा केला आणि येता येताच त्यांनी चौकीदाराचे हात बांधून त्याला धमकी देत गप्प राहण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर चोरटे शटर उचकटून आतमध्ये शिरले. वाईन शॉपच्या काऊंटरच्या पलीकडे मजबूत लोखंडी गेट असून त्याला जाडजूड कुलपे आहेत. ती तोडण्यात चोरट्यांना यश आले नाही. त्यामुळे चोरट्यांनी काऊंटरमध्ये ठेवलेली तीन ते चार हजार रुपयांची नाणी ताब्यात घेऊन बाजूच्या गोदामाकडे धाव घेतली. तेथेही मोठा मद्यसाठा होता. मात्र गोदामाच्याही लोखंडी गेटचे कुलूप तोडण्यात त्यांना यश आले नाही. दरम्यान, दिवस उजळत असल्यामुळे रस्त्याने मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची वर्दळ सुरू झाल्याचे लक्षात आल्यामुळे चोरट्यांनी तेथून काढता पाय घेतला. चोरटे निघून गेल्यानंतर चौकीदाराने बाजूच्या एका हॉस्पिटलसमोर जाऊन तेथील गार्डकडून आपले हात सोडवून घेतले. त्यानंतर वाईन शॉपच्या मालकाला माहिती दिली. त्यांनी हुडकेश्वर पोलिसांना कळविले. हुडकेश्­वर पोलिसांनी याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला. सुमारे दोन तासांचा घटनाक्रम वाईन शॉपच्या सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाला आहे.दीड महिन्यातील आठवी घटनावाईन शॉप बिअर बारमध्ये चोरी होण्याची ही गेल्या दीड महिन्यातील आठवी घटना आहे. यापूर्वीही अशा घटना विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घडल्या आहेत. पोलिसांकडून गुन्हेही दाखल झाले आहेत; मात्र एकाही चोरट्याला अटक करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी