शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 11:18 IST

माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुतण्याकडे चोरी झाली. चोरट्याने १ लाख १० हजार रुपये लंपास केले. चौकशीत वडेट्टीवारांकडे वाहनचालक म्हणून काम करणारा नोकरच चोर निघाला.

ठळक मुद्दे१ लाख १० हजार लंपासवाहनचालकच निघाला चोर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुतण्याकडे चोरी झाली. चोरट्याने १ लाख १० हजार रुपये लंपास केले. चौकशीत वडेट्टीवारांकडे वाहनचालक म्हणून काम करणारा नोकरच चोर निघाला. सीताबर्डी पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याने चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.रामदासपेठेत माजी मंत्री वडेट्टीवारांचे ‘कमलाताई’ हे आलिशान निवासस्थान आहे. वडेट्टीवारांचे पुतणे शिव संजय वडेट्टीवार (वय २०) येथेच राहतात. त्यांची बहीण शिवानी वडेट्टीवार यांनी आपल्या रूमच्या लॉकरमध्ये काही दिवसांपूर्वी दोन लाख रुपये ठेवले होते. वडेट्टीवार यांच्याकडे कारचालक म्हणून काम करणारा आणि तेथेच सर्व्हंट कॉर्टरमध्ये राहणारा आरोपी राहुल गंगाधर ठाकरे (वय २६, रा. सोनपुरी, ता. उमरेड) याने २ लाखांमधील ७० हजार रुपये काढून नेले. १३ जूनला ही चोरी लक्षात आल्यानंतर शिव वडेट्टीवार यांनी राहुलला विचारणा केली. त्याने प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे वडेट्टीवारांनी सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार खराबे यांनी वडेट्टीवारांच्या निवासस्थानी चौकशी करून आरोपीला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यापूर्वी देखील त्याने अनेकदा ५ हजार १० हजार अशी रक्कम चोरली होती. जशी गरज पडली तशी तो रक्कम चोरत होता. एकदम ७० हजार रुपये चोरल्यामुळे ते लक्षात आले. आतापावेतो एकूण १ लाख १० हजार रुपये चोरल्याचे त्याने कबूल केले. त्याला अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा