शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
4
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
5
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
8
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
10
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
11
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
12
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
13
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
14
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
15
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
20
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!

बरसला पण उकाडा वाढला

By admin | Updated: June 17, 2014 00:53 IST

उन्हामुळे त्रासलेल्या नागपूरकरांना मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिला असला तरी त्यामुळे वातावरणात वाढलेल्या आर्द्रतेच्या प्रमाणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

उपराजधानीत पावसाची हजेरी : शेतकऱ्यांना मात्र प्रतीक्षा नागपूर : उन्हामुळे त्रासलेल्या नागपूरकरांना मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिला असला तरी त्यामुळे वातावरणात वाढलेल्या आर्द्रतेच्या प्रमाणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.मागील आठवड्यात सलग ४७ अंश से. तापमानामुळे संपूर्ण शहर होरपळून निघाले असताना व सगळ्यांचे लक्ष मान्सूनकडे लागले असताना या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी येऊ लागल्या आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण केला असता तरी आर्द्रता वाढल्याने मात्र नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसभर कडाक्याचे उन्ह असताना दुपारनंतर आकाशात ढगांनी गर्दी केली. पावसाच्या जोरदार सरीही आल्या. पाऊस आणखी काही काळ सुरू राहील असे वाटत असतानाच त्याने निरोपही घेतला. सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरी जाण्याच्याच वेळी पाऊस आल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. काहींना इच्छा नसतानाही कार्यालयात थांबावे लागले तर काहींनी ओले होत घरी जाण्याचा आनंद लुटला. हा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. सोमवारी ४१ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. मंगळवारीही चित्र असेच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान निम्मा जून संपला तरी ग्रामीण भागात पेरणी योग्य पाऊस न झाल्याने शेतकरी संकटात सापडले होते. मागील वर्षी वेळेत मान्सून दाखल झाल्याने शेतकऱ्यांनी या काळापर्यंत पेरण्याही सुरू केल्या होत्या. यंदा पावसाचीच वाट बघणे सुरू आहे.(प्रतिनिधी)