शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

नागपुरातील शंकरनगर, बर्डीवरचे रस्ते पडले ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 23:43 IST

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊनचे आदेश काढल्यानंतर नागपूर शहरातील रस्ते ओस पडलेले दिसले. प्रशासनाने जाहीर केलेल्या यादीतील अत्यावश्यक सेवा वगळता बहुतेक सर्व दुकाने बंद होते.

ठळक मुद्देदुपारनंतर ऑटो सेवा किरकोळ : गोकुळपेठ बाजाराला दिसली ग्राहकांची प्रतीक्षा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊनचे आदेश काढल्यानंतर नागपूर शहरातील रस्ते ओस पडलेले दिसले. प्रशासनाने जाहीर केलेल्या यादीतील अत्यावश्यक सेवा वगळता बहुतेक सर्व दुकाने बंद होते. दुपारनंतर शहरातील ऑटो सेवाही किरकोळ दिसली. तर, गोकुळपेठच्या आठवडी बाजारात दुकानदारांना ग्राहकांची प्रतीक्षा दिसली. प्रशासनाच्या लॉकडाऊन घोषणेनंतर लोकमत प्रतिनिधीने शहरात फेरफटका मारला असता हे चित्र दिसले.

रामदासपेठ आणि धंतोली हा एरवी गजबजलेला परिसर असतो. या परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्णालये असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी असते. नाश्ता, चहा, हॉटेल्स, खानावळदेखील दिवसभर माणसांच्या गर्दीने फुललेल्या असतात. परंतु शनिवारी हा परिसर गर्दीविना जाणवला. एरवी गजबजलेल्या या परिसरातील गल्ल्या आज अगदी सुनसान जाणवत होत्या. रामदास पेठ परिसरातील एका हॉटेल जवळील गल्लीमध्ये असलेले एक-दोन झेरॉक्स सेंटर मात्र सुरू होते. या परिसरातील लाँड्रीची दुकानेही सुरू होती.
अलंकार टॉकीजचा परिसरदेखील प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देताना दिसला. येथील पेट्रोल पंपवर तुरळक गर्दी होती. पंपावरील कर्मचाऱ्यांच्या तोंडावर मास्क मात्र दिसले नाही. प्रशासनाच्या स्वच्छतेच्या आवाहनावंतरही शहरातील शंकरनगर परिसरातील चौकात फूटपाथवर मास्क विक्री दिसली. फेरीवाले अस्वच्छ हाताने मास्क विकत होते. या बाबीकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज जाणवली.गोकुळपेठ परिसरात शनिवारी भाजीबाजार भरतो. नेहमीप्रमाणे भाजी विक्रेते, व्यापारी मोठ्या प्रमाणावर माल घेऊन आले होते. परिसवारतील बहुतेक किराणा दुकानाही सुरू दिसले. मात्र बाजारात म्हणावी तशी गर्दी नव्हती. विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा जाणवली.फुलांची विक्री करणारे एक दोन किरकोळ विक्रेतेसुद्धा या बाजारात दिसले. ग्राहकच नसल्याने आपल्या मालाचे काय होणार, अशी चिंता त्यांच्या चेहऱ्यावर जाणवली.सीताबर्डी परिसर गजबजलेला परिसर असतो. मात्र या रोडवर मुलांनी मस्तपैकी क्रिकेटचा खेळ मांडला होता. मोदी नंबर दोन आणि सीताबर्डी येथील चौकातील गल्लीमध्ये लहान मुले क्रिकेटच्या खेळात रंगले होते.वाहतुकीचे नियमन करण्यासाठी शहरातील चौकातील सिग्नल सतत सुरू असतात. मात्र गर्दीच नसल्याने सर्वच चौकांमध्ये सिग्नलविना वाहतूक सुरू होती. लॉक डाऊनमुळे नागरिक घराबाहेर पडत नसल्याने ऑटोचालकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम पडलेल्या जाणवला. सकाळी रस्त्यावर ऑटोंची बऱ्यापैकी संख्या होती. मात्र दुपारनंतर ही संख्या रोडावली. सीताबर्डी परिसर प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने चालकांसाठी महत्त्वाचा असतो. या ठिकाणीसुद्धा किरकोळ ऑटो चौकात उभे दिसले.चौकातील स्पिकरवरून मुंढेंचे आवाहनशहरातील सर्व चौकांमध्ये एरवी वाहतूक नियमांसंदर्भात स्पीकरवरून आवाहन होते असते. शनिवारी मात्र शहरातील सर्वच चौकांमध्ये याच स्पिकरवरून महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचे स्वच्छतेबाबत आवाहन चौका-चौकात ऐकू येत होते. यामुळे प्रशासनाकडून सुरू असलेल्या जनजागृतीमध्ये अधिक भर पडलेली जाणवली.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर