शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

जिल्ह्यातील रस्त्यांचा लूक बदलणार

By admin | Updated: October 16, 2016 02:57 IST

राष्ट्रीय व राज्य महामार्गासोबत त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या विकासाला चालना दिल्यामुळे जिल्ह्यात १ हजार ७१४ कि.मी.

नितीन गडकरी यांचे प्रतिपादन : धापेवाडा, आदासाच्या विकासाला चालना देणार, २६,४३७ कोटींच्या कामांना मंजुरीकोराडी / सावनेर : राष्ट्रीय व राज्य महामार्गासोबत त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या विकासाला चालना दिल्यामुळे जिल्ह्यात १ हजार ७१४ कि.मी. रस्त्यांच्या विकासासाठी २६ हजार ४३७ कोटी ३२ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहे. ही कामे डिसेंबरअखेर पूर्ण केली जातील. शिवाय, धापेवाडा व आदासा हे जागतिक दर्जाचे पर्यटन व धार्मिक स्थळ व्हावे, यासाठी १०० कोटी रुपये खर्चाचा विशेष आराखडा तयार केला आहे. त्यामुळे जिल्ह्याचे चित्र पालटेल, असा विश्वासा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. सावनेर येथील नेहरू मार्केट परिसरात कोराडी - बुरुजवाडा - वलनी - सावनेर बायपास रोडच्या कामांचा शुभारंभ नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. प्रमुख अतिथी म्हणून खा. कृपाल तुमाने, खा. डॉ. विकास महात्मे, आमदार सर्वश्री सुनील केदार, डॉ. आशिष देशमुख, डी. एम. रेड्डी, सुधाकर कोहळे व गिरीश व्यास, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, माजी आ. अशोक मानकर, अशोक भुते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव चंद्रशेखर जोशी, मुख्य अभियंता सुनील देशपांडे, सावनेरच्या नगराध्यक्ष वंदना धोटे उपस्थित होते. गडकरी म्हणाले, सावनेर येथे ६५० कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ होत असून, सावनेर शहरातील भूमिगत मलनिस्सारण योजनेसाठी ९० कोटी तसेच सावनेर - तुमसर राष्ट्रीय महामागार्साठी ८४० कोटींच्या रस्ते विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. नांदगावपेठ (जिल्हा अमरावती) ते मुलताई (मध्य प्रदेश) या रस्त्याच्या विकासासाठी एक हजार कोटी रुपये मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले. कोराडी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. या परिसरातील अपघात टाळण्यासाठी उड्डाणपुलाची आवश्यकता असल्यामुळे या कामाला प्राधान्य देण्यात आले असून, पर्यटनाच्या दृष्टीने तलावाच्या विकास कामासाठी २०० कोटींच्या विकासकामांना मान्यता दिली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील बुरुजवाडा येथील उड्डाणपूल व वलनी परिसरातील भूमिगत मार्गाच्या कामांना लवकरच सुरुवात केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)खापा परिसरात मँगनीज खाण सावनेर तालुक्यातील खापा परिसरात मँगनीजची खाण सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी १०० कोटी रुपयाचा खर्च येणार आहे. या खाणीला प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. ‘फेरो अलाईज’वर खापा येथे २५० कोटींचा प्रकल्प सुरू होणार असून, या प्रकल्पासाठी लागणाऱ्या विजेच्या दराबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. या प्रकल्पात तसेच मँगनीजच्या खाणीमध्ये ३५० तरुणांना रोजगार मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. कोळशापासून सिमगॅस व युरियाकोळशापासून सिमगॅस तयार करण्यासोबतच युरिया तयार करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भात कोळशावर आधारित उद्योगांना चालना मिळणार आहे. कोल इंडियाच्या बंद खाणीमध्ये कोळसा जाळून मिथेल गॅस तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहे. शेतीवर आधारित कृषी उत्पादनावर प्रक्रिया तसेच ऊर्जेमध्ये रुपांतरित करून शेती सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. सिंचन क्षमता वाढविण्यासाठी कोच्ची प्रकल्पासारख्या सिंचनाच्या सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी ठिंबक सिंचनाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन ना. नितीन गडकरी यांनी केले. नगर परिषद प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सावनेर नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी खा. कृपाल तुमाने, खा. डॉ. विकास महात्मे, आमदार सर्वश्री डॉ. आशिष देशमुख, गिरीश व्यास, सुधाकर कोहळे व सुधीर पारवे, डॉ. राजीव पोतदार, दादाराव मंगळे, प्रकाश टेकाडे, संजय टेकाडे, अशोक धोटे उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष वंदना धोटे, उपाध्यक्ष सूरजकला सेवके, मुख्याधिकारी मिलिंद साठवणे, बांधकाम सभापती रामराव मोवाडे, पाणीपुरवठा व शिक्षण सभापती अ‍ॅड. शैलेश जैन, महिला व बालकल्याण सभापती ममता नारनवरे, अ‍ॅड. अरविंद लोधी, सुषमा दिवटे, राजेंद्र नारनवरे, तेजसिंग सावजी, वैशाली उईके, विणा कोल्हे, मंजूषा गुप्ता, माया जयस्वाल, रवींद्र ठाकूर, किशोरी बसवार, ज्योती मच्छले, राजू घुगल, डोमासाव सावजी, पवन जयस्वाल यांच्यासह नागरिक उपस्थित होते.