शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात नदी स्वच्छता अभियान सुरू :पहिल्यांदाच मार्चमध्ये सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 00:10 IST

‘कोरोना’मुळे शहरात असलेल्या ‘लॉकडाऊन’चा फायदा घेत नदी स्वच्छता अभियानाच्या इतिहासात पहिल्यांदाच मार्च महिन्यात अभियानाला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देनाग नदीसह पिवळी व पोरा नदीही होणार स्वच्छआयुक्त तुकाराम मुंढे यांचे निर्देश : २० दिवसात होणार स्वच्छ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’मुळे शहरात असलेल्या ‘लॉकडाऊन’चा फायदा घेत नदी स्वच्छता अभियानाच्या इतिहासात पहिल्यांदाच मार्च महिन्यात अभियानाला सुरुवात झाली आहे. पंचशील चौक येथे असलेल्या नाग नदीतून या अभियानाला शनिवारी २८ मार्चपासून सुरुवात झाली. विशेष म्हणजे, नदी स्वच्छता अभियानासाठी आवश्यक सर्व यंत्रसामुग्रीची सोय करीत, पुढील २० दिवसात तीनही नद्यांची स्वच्छता पूर्ण करावी, असे निर्देश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.नदी स्वच्छता अभियानात नागपूर शहरातील नाग नदी, पिवळी नदी आणि पोरा नदी या तीन नद्यांची स्वच्छता होणार आहे. नाग नदीचा १७ किलोमीटरचा स्ट्रेच असून, पाच भागात त्याची विभागणी करण्यात आली आहे. पिवळी नदीची चार भागात तर पोरा नदीची तीन भागात विभागणी करण्यात आली आहे. स्वच्छतेच्या आणि कामाच्या दृष्टीने ही विभागणी असून, प्रत्येक विभागाची जबाबदारी स्वतंत्र अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. स्वच्छता करण्यात येणाऱ्या तीनही नद्यांची लांबी एकूण ४८ कि.मी. आहे.मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात संपूर्ण अभियानाचे प्रमुख म्हणून तांत्रिक सल्लागार (नद्या व सरोवरे) मो. इसराईल यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अधीक्षक अभियंता श्वेता बॅनजी आणि यांत्रिकी अभियंता उज्ज्वल लांजेवार हे नदी स्वच्छता अभियानाचे समन्वयन करतील.शनिवारी नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला असून, पंचशील चौक ते अंबाझरी या नाग नदीच्या स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे नदीचा प्रवाह सुरळीत व्हावा, यासाठी नदीतून घाण, कचरा आणि गाळ काढण्यात येणार आहे. हा संपूर्ण कचरा, गाळ नदीच्या बाजूलाच न ठेवता इतरत्र टाकण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. यापूर्वी अगदी पावसाळ्याच्या तोंडावर नदी स्वच्छता होत होती आणि नदीकाठावरच गाळ टाकला जायचा. येणाºया पावसामुळे संपूर्ण गाळ पुन्हा नदीत जायचा आणि नदीकाठावरील घरात पावसाचे पाणी शिरायचे. आता नदी स्वच्छता अभियानाचे मार्च महिन्यातच काम सुरू झाल्याने संभावित सर्व धोके टाळण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Naag Riverनाग नदीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका