शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात नदी स्वच्छता अभियान अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 19:59 IST

शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा नदी स्वच्छता अभियानाला महापालिकेतर्फे दरवर्षी मे महिन्यात सुरुवात केली जात होती. परंतु यावर्षी मार्च महिन्यात सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे एकाच वेळी तिन्ही नद्यांच्या स्वच्छतेला सुरूवात करण्यात आली.

ठळक मुद्दे२० मेपर्यंत काम पूर्ण होण्याची आशा : नालेसफाई ३० मेपर्यंत चालणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा नदी स्वच्छता अभियानाला महापालिकेतर्फे दरवर्षी मे महिन्यात सुरुवात केली जात होती. परंतु यावर्षी मार्च महिन्यात सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे एकाच वेळी तिन्ही नद्यांच्या स्वच्छतेला सुरूवात करण्यात आली. नदी स्वच्छतेचे काम अंतिम टप्प्यात असून २० मेपर्यंत काम पूर्ण केले जाणार आहे. शहरातील नालेसफाईच्या कामालाही गती असून असून ३१ मेपर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे.नागपूर महापालिका दरवर्षी लोकसहभागातून नदी स्वच्छता अभियान राबविते. याअंतर्गत शहरातील नागनदी, पिवळी नदी आणि पोहरा नदीची स्वच्छता करण्यात येते. पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होऊ नये, प्रवाह चांगला होऊन वस्त्यांमध्ये पाणी शिरू नये, हा त्यामागील उद्देश असते. पावसाळ्याच्या तोंडावर होणारे दरवर्षीचे काम यंदा मात्र दोन महिने अगोदर सुरू झाले आहे.दरवर्षी नदी स्वच्छता मोहीम राबविताना नदीतील गाळ हा नदी पात्रालात बाजूला टाकला जात होता. मात्र यावषीं नदीपात्रातील गाळ बाहेर काढून तो शहरातील खोलगट वा पाणी साचणाºया भागात टाकला जात आहे. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात सखल भागात पाणी साचणार नाही. तसेच पावसाळ्यात नद्यांचे पाणी लगतच्या वस्त्यात शिरणार नाही. यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली.खोलीकरण व रुंदीकरणामुळे नद्यांचे र्सौदर्य फुलण्याला मदत होणार आहे. अभियान युद्धपातळीवर सुरू आहे. या नद्यांच्या स्वच्छतेसोबतच शहरातील दहा झोन अंतर्गत येणाºया सुमारे २२७ नाल्यांची स्वच्छता केली जात आहे. त्यापैकी पाचझोनमधील १३३ नाल्यांच्या स्वच्छतेला एप्रिल महिन्यात सुरुवात झाली. मनपा तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. ३१ मेपर्यंत शहरातील संपूर्ण नाले स्वच्छ करण्याचा त्यांचा मानस आहे.१० झोनमध्ये २२७ नालेमनपा हद्दीतील १० झोनमध्ये २२७ नाले आहेत. लक्ष्मीनगर झोनमध्ये २२, धरमपेठ ३५, हनुमाननगर १४, धंतोली १४, नेहरुनगर १५, गांधीबाग ५१, सतरंजीपुरा झोनमध्ये २२, लकडगंज सात, आशीनगर १८ आणि मंगळवारी झोनमध्ये २९ नाले आहेत. यापैकी ७१ नाल्यांची पोकलेनद्वारे स्वच्छता करण्यात येणार आहे. जेथे पोकलेन जाऊ शकत नाही अशा उर्वरित नाल्यांची स्वच्छता मनुष्यबळाद्वारे केली जात आहे.

टॅग्स :Naag Riverनाग नदीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका