शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कचरा संकलन कर्मचाऱ्यांना संक्रमणाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 22:56 IST

मनपाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची रोटेशननुसार ड्यूटी लावली आहे. परंतु घरातील कचरा उचलणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्याबाबतीत दूर्लक्ष केले जात आहे.

ठळक मुद्देमास्क, हॅण्ड ग्लोव्हचा उपयोग करण्याकडे दुर्लक्ष

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या संक्रमणावर अंकुश लावण्यासाठी राज्य सरकार व जिल्हा प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. मनपाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची रोटेशननुसार ड्यूटी लावली आहे. परंतु घरातील कचरा उचलणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्याबाबतीत दूर्लक्ष केले जात आहे. कचरा संकलन वाहनावर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मास्क, हॅण्ड ग्लोव्हज घालणे आवश्यक आहे. परंतु अनेक वाहनावर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या तोंडाला मास्क व हातात ग्लोव्हज दिसत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.शहरात कचरा संकलनासाठी शहरात दोन कंपन्या नियुक्त केल्या आहेत. यात झोन १ ते ५ ची जबाबदारी एजी एन्व्हायरो तसेच ६ ते १० झोन ची जबाबदारी बीव्हीजी कंपनीला दिली आहे. शहरात ५५० पेक्षा अधिक कचरा संकलन वाहने आहेत. एका वाहनावर ड्रायव्हर व एक सहायक असतो. कोरोनाच्या भीतीने कर्मचाऱ्यांना मास्क आणि ग्लोव्हज दिले आहे. मात्र वाहनावरील ड्रायव्हर व सहायकांकडून त्याचा उपयोग होताना दिसत नाही. काही वाहनावरील कर्मचारी आरोग्याची काळजी घेत सुरक्षा साधने उपयोगात आणत आहे. असे असले तरी ६० टक्के वाहनांवर कचरा संकलन करणारे सुरक्षा मानकांकडे दूर्लक्ष करीत आहे.वाहनावरील तैनात कर्मचाऱ्यांनी सांगितले की, ग्लोव्हज व मास्कची गुणवत्ता योग्य नाही. कचरा उचलताना ग्लोव्हज फाटतात. पुन्हा मागितल्यावर मिळत नाहीत. सुविधा तर सोडा वेतनसुद्धा वेळेवर मिळत नाही.आऊटर वस्त्यांमध्ये एका दिवसानंतर येताहेत कचऱ्याच्या गाड्यापूर्व, उत्तर व दक्षिण नागपूरच्या आऊटर वस्त्यांमध्ये एक दिवसांच्या अतरात कचरा संकलन करणारे वाहन येत आहे. मनपा प्रशासनाने दावा केला होता की रोज कचरा संकलन करणारे वाहन येईल. पूर्व नागपुरातील नसेमन सोसायटी, विकासानंद हाऊसिंग सोसायटी, विजयनगर, भरतवाडा रोडवरील वस्त्यांमध्ये एका दिवसानंतर कचऱ्याचे वाहन येत आहे. दररोज ओला व वाळला कचरा वेगवेगळा करणे सुरू केले आहे. उत्तर नागपुरातील यशोधरानगर, राणी दुर्गावतीनगर, ऑटोमोटिव्ह चौक येथे कचरागाड्या नियमित येत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGarbage Disposal Issueकचरा प्रश्न