शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

कॅन्सरच्या ट्रीटमेंटनंतर उद्भवू शकतो लिम्फेडिमाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 11:45 IST

कॅन्सरचा उपचार केल्यानंतर आपण सर्व धोक्याच्या पार झालो, असे वाटत असेल तर तो भ्रम ठरेल. या ट्रीटमेंटनंतरही रुग्णाला लिम्फेडिमा होण्याचा धोका कायम असतो.

ठळक मुद्देजगात १४० दशलक्ष प्रभावितनियंत्रणातून सामान्य आयुष्य जगणे शक्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॅन्सरचा उपचार केल्यानंतर आपण सर्व धोक्याच्या पार झालो, असे वाटत असेल तर तो भ्रम ठरेल. या ट्रीटमेंटनंतरही रुग्णाला लिम्फेडिमा होण्याचा धोका कायम असतो. लिम्फा(लसिका)च्या संतुलनात बिघाड होऊन लिम्फेडिमाची स्थिती निर्माण होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगात १४० ते १५० दशलक्ष लिम्फेडिमाच्या विळख्यात सापडले आहेत. धक्कादायक म्हणजे यातील ४० ते ५० टक्के प्रमाण भारतात आहे. यावर उपचार करणे शक्य नाही. मात्र आधुनिक उपचार पद्धतीने यावर नियंत्रण ठेवून सामान्य आयुष्य जगता येऊ शकते. मात्र यासाठी कायम जागरूक असणे आवश्यक आहे.प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ व लिम्फे डिमा थेरेपिस्ट डॉ. रोहिणी पाटील यांनी लिम्फेडिमाबाबत जागृतीचे अभियान चालविले आहे. त्यांनी दिलेल्या वैद्यकीय माहितीनुसार लिम्फेडिमा हा शरीराच्या विशिष्ट भागात सूज येण्याची असामान्य स्थिती निर्माण करणारा आजार आहे. रक्ताऐवजी शरीरामध्ये तरल पदार्थ वहन करणाऱ्या लिम्फ ग्रंथीं(लसिका)मध्ये असंतुलन आल्यास ही सूज येते. सामान्यपणे असा प्रकार होऊ शकतो. मात्र कॅन्सरचे निदान करताना लसिका ग्रंथीची शल्यक्रिया किंवा कॅन्सरची ट्रीटमेंट करण्यासाठी रेडिओथेरेपी, किमोथेरेपी केल्याने या लसिका ग्रंथीमध्ये असंतुलन निर्माण होते. यामुळे तरल पदार्थ प्रवाहित होण्यास बाधा निर्माण होते. ही शक्यता ट्रीटमेंटनंतर ५० ते ६० टक्के अधिक असते व कॅन्सर रुग्णांना आयुष्यभर हा धोका कधीही होण्याची शक्यता असते.ब्रेस्ट कॅन्सरचा उपचार घेतलेल्या रुग्णाला हात, छाती व पोटाच्या भागात लिम्फेडिमा होण्याची शक्यता असते, तर प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णांना पाय व पोटावर होण्याची शक्यता असते.प्राथमिकस्तरावर हात किंवा पायाला सूज येते. कपडे टाईट होतात. ही सूज असामान्य असते व शरीराच्या प्रभावित भागाला कडकपणा येतो. ही सूज उत्तरोत्तर वाढत जाते. सुजलेल्या ठिकाणी खाज येणे, हालचाल करण्यास व झोपण्यास त्रास होतो. उपचार न घेतल्यास सुजलेल्या भागातून द्रव बाहेर पडते व त्यावर इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.कॅन्सरचा उपचार केल्यानंतरही लिम्फेडिमा होणे हा त्या व्यक्तीवर शारीरिक आणि मानसिक आघात करणारा असतो. कॅन्सर रुग्णाला हा आयुष्यात कधीही उद््भवू शकतो व यावर उपचार शक्य नाही. मात्र लवकर निदान झाल्यास लिम्फेडिमाला नियंत्रित ठेवून सामान्य आयुष्य जगणे शक्य आहे.

काय आहे लिम्फेडिमा?लिम्फेडिमा हा शरीराच्या विशिष्ट भागावर असामान्य सूज येण्याचा प्रकार आहे. माणसाच्या शरीरात रक्ताप्रमाणेच लिम्फ किंवा लसिका नामक ग्रंथी असते, जी प्रोटिन, फॅट्स व इतर तरल पदार्थ शरीरात प्रवाहित करण्यास मदत करते. एखादे संक्रमण, कॅन्सरची स्थिती किंवा कॅन्सरच्या उपचारासाठी होणाऱ्या शस्त्रक्रिया व विकिरणामुळे या ग्रंथीला आघात निर्माण होतो. त्यामुळे तरल पदार्थ प्रवाहित होण्यास बाधा निर्माण होते व शरीराच्या विशिष्ट भागात सूज येते. लिम्फेडिमाची सूज इतर सुजेप्रमाणे सामान्य नसते. यात कडकपणा येतो व हालचाल करणे कठीण होते. यामुळे चेहरा किंवा सूज आलेला शरीराचा भाग विकृत दिसायला लागतो. ही सूज वाढत जाते व उपचार न घेतल्यास फुटून द्रव बाहेर येते.

लिम्फेडिमावर प्रभावी सीडीटी उपचारडॉ. रोहिणी पाटील यांनी सांगितले, लिम्फेडिमावर नियंत्रणासाठी जनजागृती हा सर्वोत्तम पर्याय आहे. यापूर्वी मालिश आणि औषधोपचाराद्वारे हे नियंत्रित केले जात होते. मात्र आधुनिक तंत्राद्वारे उपचार सोपे झाले आहेत. कम्प्लीट डिकन्जेस्टीव्ह थेरेपी(सीडीटी)मुळे लिम्फेडिमावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. याशिवाय व्हॅस्क्युलर लिम्फ नोड ट्रान्सफर (व्हीएलएनटी) व इतर काही उपचार पद्धतीही विकसित झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.भारतातील पहिल्या लिम्फेडिमा थेरेपिस्टस्त्रीरोग व कॅन्सर तज्ज्ञ डॉ. रोहिणी पाटील यांनी अमेरिकेच्या मान्यताप्राप्त आरोग्य संस्थेच्यावतीने लिम्फेडिमा थेरेपिस्ट म्हणून पदवी संपादन केली आहे. ही पदवी संपादन करणाऱ्या त्या भारतातील पहिल्या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. स्नेहांचलमध्ये कॅन्सर रुग्णांच्या सेवेत राहणाऱ्या डॉ. पाटील यांनी या अभ्यासातून लिम्फेडिमाची गंभीरता जाणून घेतली. ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती अभियानासाठी दिवसरात्र एक करणाऱ्या डॉ. रोहिणी यांनी लिम्फेडिमाबाबत जनजागृती अभियान राबविण्याचा मनोदय लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :Healthआरोग्यcancerकर्करोग