शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’ मध्ये ऋषभ गेडाम नागपुरात ‘टॉप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 11:00 IST

‘आयआयटी’मध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’चा निकाल रविवारी जाहीर झाला. शहरातून दिल्ली पब्लिक स्कूलचा विद्यार्थी ऋषभ गेडाम हा अव्वल क्रमांकावर राहिला.

ठळक मुद्दे५० हून अधिक विद्यार्थी पात्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘आयआयटी’मध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’चा निकाल रविवारी जाहीर झाला. शहरातून दिल्ली पब्लिक स्कूलचा विद्यार्थी ऋषभ गेडाम हा अव्वल क्रमांकावर राहिला. त्याने देशपातळीवर १३० वा क्रमांक पटकाविला. नागपूर शहरातून ५० हून अधिक विद्यार्थी चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले असल्याची माहिती विविध महाविद्यालयांतून प्राप्त झाली.‘जेईई-मेन्स’मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’साठी पात्र ठरले होते. २० मे रोजी ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’ची परीक्षा पार पडली. ‘जेईई-मेन्स’मध्ये ऋषभ गेडामचा अखिल भारतीय पातळीवर १ हजार २७ वा क्रमांक होता. मात्र ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’मध्ये त्याने सर्वांना चकित केले. ‘एससी’ प्रवर्गात तो देशपातळीवर तिसºया क्रमांकावर आहे हे विशेष. ऋषभपाठोपाठ जी.एच.रायसोनी विद्यानिकेतनचा हितेश कंदाला (एआयआर-१६८) याने बाजी मारली. त्याचप्रमाणे मोहम्मद तौफिक (एआयआर-३०३), वेदांत बंग (एआयआर-५१९), हर्षद इंगोले (एआयआर-८१०), निर्मल कार्तिक (एआयआर-१०३४), आशय पल्लीवार (१९१६) यांनीदेखील पहिल्या दोन हजार विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळविण्यात यश मिळविले. शिवाजी विज्ञान महाविद्यालयातून ३० विद्यार्थी चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले असून ‘आयआयटी’ प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.

सरावातूनच मिळाले यश : ऋषभ गेडाम ‘जेईई-मेन्स’मध्ये काहीशा माघारलेल्या ऋषभ गेडाम याने ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’मध्ये मेहनतीच्या भरवशावर यश मिळविले. मी ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’च्या अभ्यासासाठी वेगळा ‘पॅटर्न’ अवलंबिला होता. दररोज ३ ते ४ पेपर्स सोडविण्यावर माझा भर रहायचा. त्यानंतर ज्या प्रश्नांत अडचण आली, ते मुद्दे सखोल वाचायचो. यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. ‘आयआयटी’तून अभियांत्रिकीचा अभ्यास करण्याचे अगोदरपासूनचे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण होणार असल्याचे समाधान आहे. ‘आयआयटी-पवई’ येथून संगणक विज्ञान विषयात अभियांत्रिकी करणार असल्याचे ऋषभने सांगितले. आपल्या यशाचे श्रेय त्याने आई नंदा, वडील राजेश व ‘वायआरसीई ग्रुप’च्या ‘पेस आयआयटी व मेडिकल’ला दिले आहे.

नियमित अभ्यासावर भर : हितेश कंदालाजी.एच.रायसोनी विद्यानिकेतनचा विद्यार्थी असलेल्या हितेश हेमराय कंदाला याचा ‘जेईई-मेन्स’मध्ये ३७ वा क्रमांक होता. मी वर्षभर नियमित अभ्यासावर भर दिला होता. सोबतच सरावदेखील सुरू होता. निकाल अपेक्षित होता. ‘आयआयटी-पवई’ येथून ‘इलेक्ट्रीकल’ शाखेत पदवी घ्यायची आहे, असे हितेशने सांगितले.

वर्षभराच्या मेहनतीचे फळ : मोहम्मद तौफिकरॉयल गोंडवाना पब्लिक स्कूलचा विद्यार्थी मोहम्मद तौफिक याने आपल्या यशाचे श्रेय वडील डॉ.मोहम्मद अतिक व आई सर्वत अंजुम यांना दिले आहे. वडील डॉक्टर असले तरी मला अभियांत्रिकीतच रस होता. ‘जेईई-मेन्स’मध्ये अखिल भारतीय पातळीवर ३३२ वा क्रमांक होता. वर्षभर नियमित अभ्यासावर भर दिला. त्याचेच फळ मिळाले. ‘आयआयटी-पवई’ येथून मला संगणक विज्ञान शाखेत अभियांत्रिकी करायचे आहे, असे त्याने सांगितले.

टॅग्स :examपरीक्षा