शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षांत झाल्यावर लगेच ‘आॅनलाईन’ पदवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:14 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०४ वा दीक्षांत समारंभ खºया अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : ‘एनएसडीएल’कडे सर्व माहिती तयार, एका ‘क्लिक’वर प्रमाणपत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०४ वा दीक्षांत समारंभ खºया अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. दीक्षांत समारंभानंतर पदवीसाठी विद्यार्थ्यांना महिनोंमहिने प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र ‘एनएसडीएल’सोबत विद्यापीठाला ‘लिंक’ करण्यात आले असून या माध्यमातून दीक्षांत समारंभानंतर दुसºया दिवशीच विद्यार्थ्यांना पदवीची ‘आॅनलाईन’ प्रत मिळू शकणार आहे. शिवाय पदवीची मूळ प्रतदेखील महिनाभरात विद्यार्थ्यांच्या हाती राहील, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी दिली.देशभरात बोगस शैक्षणिक प्रमाणपत्रांची प्रकरणे वाढली आहे. अशा प्रकारे कुणाचीही फसवणूक होऊ नये व विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाची अशी ही कागदपत्रे सुरक्षित राहावीत यासाठी केंद्र शासनाने ‘एनएडी’ सेवा सुरू करण्याची घोषणा केली. यासंदर्भात ‘एनएसडीएल’ व ‘सीडीएल’ या केंद्र शासनाने नेमलेल्या दोन कंपन्यांसोबत विद्यापीठाने दोन्ही कंपन्यांशी सामंजस्य करार केला आहे. यानुसार आता दीक्षांत समारंभात पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे ‘डिजिटल’ करण्यात येतील. विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे जगातून कुठूनदेखील पाहता येतील. यासंदर्भात विद्यार्थ्यांना ‘आॅनलाईन’ नोंदणी करावी लागेल. त्यानंतर त्यांना ‘युजर आयडी’ व ‘पासवर्ड’ देण्यात येईल.ही सेवा विद्यार्थ्यांना विनामूल्य उपलब्ध आहे. दीक्षांत समारंभ झाल्यानंतर लगेच दुसºया दिवशी ही ‘लिंक’ विद्यार्थ्यांसाठी खुली होईल. याची सूचना लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे डॉ.येवले यांनी सांगितले.यासंदर्भात ‘एनएसडीएल’कडे सर्व विद्यार्थ्यांची माहिती व सखोल ‘डाटा’ उपलब्ध करून देण्यात आला असून ‘सॉफ्टकॉपी’ तयार करण्याचे काम जवळपास पूर्णत्वाकडे आहे, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.विद्यार्थ्यांची पायपीट वाचणारपदवी, गुणपत्रिका यांचे सत्यापन करण्यासाठी विद्यार्थी तसेच बाहेरील कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज येतात. शिवाय ‘प्रोव्हिजनल’ प्रमाणपत्र, पदवी पडताळणी इत्यादीमुळेदेखील मनुष्यबळावर ताण पडतो. जगातील अनेक विद्यापीठांत ही सर्व कागदपत्रे ‘आॅनलाईन’ उपलब्ध असून त्यांचे सत्यापन सुकर पद्धतीने होते. त्यामुळे या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांची पायपीट वाचेल.