शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

 शाळांतील खिचडी बंद पडण्याच्या वाटेवर; डिसेंबरनंतर तांदूळ मिळालाच नाही

By गणेश हुड | Updated: February 28, 2023 19:43 IST

नागपूरमधील अनुदानित शाळांमधील शालेय पोषण आहाराचा तादूळ पुरवठा मागील तीन महिन्यापासून बंद आहे. 

नागपूर: जिल्हा परिषद, तसेच अनुदानित शाळांमधील शालेय पोषण आहाराचा तादूळ पुरवठा मागील तीन महिन्यापासून बंद आहे. आधिच्या शिल्लक साठ्यातून खिचडी दिली जात आहे. जुना साठा संपल्याने ८ शाळांमध्ये खिचडी शिजली नाही. आठवडाभरात मार्च महिन्यासाठी तांदूळ मिळाला नाही तर शाळांतील खिचडी वाटप बंद पडणार असल्याची माहिती शिक्षकांनी दिली. भारतीय अन्न महामंडळाकडून तांदूळ निःशुल्क देण्यात येतो. पण सरकारने शाळांना तांदुळाचा पुरवठा करण्यासाठी पुरवठादार नियुक्त केला नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.

वर्ग पहिला ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार योजना आहे. नागपूर जिल्हयातील २७४८ शाळांतील ३ लाख १३ हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. यात जिल्हा परिषद,खासगी अनुदानित, महापालिकेच्या शाळांचा समावेश आहे. एक ते पाच वर्गांतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०० ग्राम तांदूळ दिला जातो. तर वर्ग सहा ते आठपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५० ग्राम तांदूळ दिला जातो. मात्र मार्च महिन्यासाठी फेब्रुवारी महिन्यात तांदुळाचा पुरवठाच झालेला नाही. जुना साठा संपत आला आहे. साठा संपल्याने आठ शाळांतील विद्यार्थ्यांना खिचडी मिळालेली नाही. जिल्हा परिषदेच्या शालेय पोषण आहार विभागातील अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला. तेल, मिळाचे पैसे लवकर मिळत नाही२० ग्राम डाळ व इतर पोषण आहारामधील बिस्कीट, राजगिऱ्याचे लाडू, हळद, मीठ, तिखट, भाजीपाला व इंधन खर्च शाळा व्यवस्थापनाला करावा लागतो. हा पैसा तीन- चार महिने मिळत नाही. पैसे वेळेवर मिळत नसल्याने महिला बचत गटांनी खिचडी वाटपाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांना स्वत:हा खर्च करावा लागतो. शासनाकडून हा निधी कधी मिळेल याची तारीख ठरलेली नाही. डिसेंबर नंतर तांदूळ मिळाला नाहीजानेवारी महिन्यासाठी डिसेंबर महिन्यात तांदूळ मिळाला होता. त्यानंतर मिळालेला नाही. नवीन निविदा काढण्यात आल्या नसल्याचे गेल्या महिनाभरापासून पोषण आहारवाटप विस्कळीत झाले आहे. सध्या शिल्लक साठ्यातून खिचडी वाटप सुरू आहे

 

टॅग्स :nagpurनागपूर