शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

फुले दाम्पत्यास ‘भारतरत्न’च्या मागणीसाठी क्रांतियात्रा निघणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 21:56 IST

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, या मागणीसाठी ११ एप्रिल रोजी क्रांतियात्रा काढण्यात येणार आहे. महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने बहुजन समाजातील पुरोगामी विचाराने कार्य करणाऱ्या ५० च्या जवळपास सामाजिक संघटनांतर्फे महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ही क्रांतियात्रा काढण्यात येत आहे.

ठळक मुद्देविविध संघटनांचे संयुक्त आयोजन : ६० चित्ररथातून जीवनकार्याचे दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, या मागणीसाठी ११ एप्रिल रोजी क्रांतियात्रा काढण्यात येणार आहे. महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने बहुजन समाजातील पुरोगामी विचाराने कार्य करणाऱ्या ५० च्या जवळपास सामाजिक संघटनांतर्फे महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ही क्रांतियात्रा काढण्यात येत आहे.राष्ट्रीय  ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय  अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत या आयोजनाबाबत माहिती दिली. स्त्रीशिक्षण व सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात महात्मा फुले व सावित्रीबाई यांचे कार्य अनन्यसाधारण आहे. त्यामुळे या दाम्पत्याला आतापर्यंत भारतरत्न मिळायला हवा होता. आता तरी उशीर न करता फुले दाम्पत्यास हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करावा, अशी मागणी त्यांनी केली. ११ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता महात्मा फुले सभागृह, रेशीमबाग येथून क्रांतियात्रेला सुरुवात होणार आहे. चंदननगर, क्रीडा चौक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक, मानेवाडा रोड, उदयनगर, जुना सुभेदार व सक्करदरा मार्गे होत रेशीमबागच्या सभागृहात सकाळी ११ वाजता यात्रेचा समारोप होईल. या क्रांतियात्रेत ६० चित्ररथांचा समावेश राहणार असून यातून महात्मा फुले, सावित्रीबाई यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज आदी समाजसुधारकांच्या जीवनकार्याचे दर्शन घडविले जाईल. पत्रपरिषदेत महात्मा फुले संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण पवार, उपाध्यक्ष गुलाबराव चिचाटे, गिरीश पांडव, शकील पटेल आदी उपस्थित होते.ओबीसीमध्ये मराठ्यांच्या समावेशाला विरोधमराठ्यांना आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, मात्र ओबीसी आरक्षणामध्ये त्यांचा समावेश आम्हाला मान्य नाही, असे बबनराव तायवाडे यांनी यावेळी स्पष्ट केले. ओबीसीमध्ये अनेक जातींचा समावेश आहे व त्यामानाने आरक्षणाचे प्रमाण आधीच कमी आहे. त्यामुळे सरकारने मराठ्यांसाठी स्वतंत्रपणे आरक्षणाची तरतूद करावी. ओबीसी आरक्षणात त्यांना समाविष्ट होऊ देणार नाही व त्याचा जाहीर विरोध करू, असे तायवाडे यांनी स्पष्ट केले. राज्य मागासवर्गीय आयोगाच्या नागपूरला येणाऱ्या कमिटीला याबाबत निवेदन सादर करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक