शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

'फायटॉराईड' पद्धतीने नागपुरातील नाईक तलावाचे पुनरुज्जीवन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 22:06 IST

‘फायटॉराईड’ पद्धतीचा उपयोग करून भोसलेकालीन नाईक तलावाचे पुनरुज्जीवन करण्याची सूचना नीरीतर्फे नागपूर महानगरपालिकेला करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनीरीने मनपाला दिली माहिती : ‘फ्लोराफ्ट्स’ व ‘एरिएटर्स’ तंत्रज्ञानाचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भोसलेकालीन नाईक तलावाच्या पुनर्जीवनासाठी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी) पुढाकार घेतला आहे. ‘फायटॉराईड’ पद्धतीचा उपयोग करून नाईक तलावाचे पुनरुज्जीवन करण्याची सूचना नीरीतर्फे नागपूर महानगरपालिकेला करण्यात आली आहे. शुक्रवारी उपमहापौर दीपराज पार्डीकर यांच्या अध्यक्षतेत मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत नीरीने प्रस्तावित प्रकल्पाची माहिती सादर केली.बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर, जलप्रदाय समिती सभापती विजय झलके, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरूची राजगिरे, नगरसेविका यशश्री नंदनवार, कार्यकारी अभियंता राजेश भूतकार, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, नीरी च्या वरिष्ठ तांत्रिक अधिकारी डॉ. रिता धापोडकर, नदी पुनर्जीवन प्रकल्पाचे अधिकारी मोहम्मद शफीक आदी उपस्थित होते.यावेळी नीरी च्या वरीष्ठ तांत्रिक अधिकारी रिता धोपडकर यांनी प्रकल्पाची विस्तृत माहिती दिली. सद्यस्थितीत नाईक तलावात सिवेजचे पाणी जात असल्याने तलाव प्रदूषित झाले आहे. या तलावाचे पाणी शुद्ध करण्याकरिता ‘फायटॉराईड’ पद्धतीचे ट्रीटमेंट प्रकल्प लावण्यात येईल. या प्रकल्पाद्वारे तिन्ही सिवेज लाईन जोडून त्यावर प्रक्रिया करून ते पाणी पुन्हा तलावात सोडण्यात येईल. १.८ एमएलडी एवढी ट्रीटमेंट प्रकल्पाची क्षमता असेल. याशिवाय नीरीद्वारे तलावाची सफाई करुन त्यातील घाण बाहेर काढण्यात येईल. तलावाचे पाणी साफ ठेवण्यासाठी ‘फ्लोराफ्ट्स’ व ‘एरिएटर्स’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. तलावाची फेन्सिंग करुन ते सुरक्षित करण्यात येईल. हरित लवादच्या निर्देशानुसार पाण्याची गुणवत्ता राखली जाईल, असेही तांत्रिक अधिकारी डॉ. रिता धापोडकर यांनी सांगितले.कासवांमुळे तलावाच्या पुनर्जीवनाची आशाविशेष म्हणजे तलावात दोन मोठे कासव आहेत. त्यामुळे तलावाचे पुनर्जीवनाची आशा असल्याचे नीरीतर्फे सांगण्यात आले आहे. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर म्हणाले, नीरीच्या माध्यमातून तलावाला नवी संजीवनी देण्यासाठी सोलर पॅनलचाही उपयोग करण्यात येईल. या प्रस्तावार तात्काळ अंमलबजावणी करणे तसेच सौंदर्यीकरण कार्य पूर्ण करण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाNaik Lakeनाईक तलावnagpurनागपूर