शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विमा हप्त्याची रक्कम ८ टक्के व्याजासह परत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 21:13 IST

ग्राहकाची विमा पॉलिसी रद्द करून त्याला नियमाप्रमाणे देय होणारी हप्त्याची रक्कम ८ टक्के व्याजाने परत करण्यात यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने अ‍ॅक्सिस बँक वर्धा रोड व मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी यांना दिला आहे. व्याज ८ मे २०१४ पासून लागू करण्यात आले आहे. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासापोटी ५००० व तक्रारीच्या खर्चापोटी ३००० रुपये मंजूर करण्यात आले आहे.

ठळक मुद्देग्राहक मंच : अ‍ॅक्सिस बँक व मॅक्स इन्शुरन्स कंपनीला आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्राहकाची विमा पॉलिसी रद्द करून त्याला नियमाप्रमाणे देय होणारी हप्त्याची रक्कम ८ टक्के व्याजाने परत करण्यात यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने अ‍ॅक्सिस बँक वर्धा रोड व मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी यांना दिला आहे. व्याज ८ मे २०१४ पासून लागू करण्यात आले आहे. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासापोटी ५००० व तक्रारीच्या खर्चापोटी ३००० रुपये मंजूर करण्यात आले आहे.मंचचे अध्यक्ष विजय प्रेमचंदानी व सदस्य नितीन घरडे यांनी हा निर्णय दिला. मनिराम शुक्ला असे ग्राहकाचे नाव आहे. मंचमधील तक्रारीनुसार, शुक्ला यांचे अ‍ॅक्सिस बँक, वर्धा रोड येथे चालू खाते होते. त्यांनी स्वत:च्या भविष्याचा विचार करून मॅक्स इन्शुरन्स कंपनीकडून २३ एप्रिल २०१३ रोजी विमा पॉलिसी काढली. त्याचा वार्षिक हप्ता २ लाख ४६ हजार २९६.९७ रुपये होता. त्यानंतर शुक्ला यांनी काही कारणास्तव पॉलिसी रद्द करण्याचा निर्णय घेऊन, मार्च-२०१४ मध्ये अ‍ॅक्सिस बँकेला त्याची माहिती दिली. तसेच, हप्त्याची रक्कम परत करण्याची विनंती केली. त्याकरिता १५ एप्रिल २०१४ रोजी बँक व कंपनीकडे प्रस्ताव सादर केला. परंतु, आवश्यक ते सर्व प्रयत्न करूनही शुक्ला यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम १२ अंतर्गत मंचमध्ये तक्रार दाखल केली होती. मंचने विविध बाबी लक्षात घेता, तक्रार अंशत: मंजूर करून हा निर्णय दिला.असे होते बँकेचे म्हणणेशुक्ला यांनी मॅक्स इन्शुरन्स कंपनीकडून विमा काढला. त्याकरिता बँक जबाबदार नाही. शुक्ला यांचे सर्व आरोप निराधार आहेत. त्यांनी विमा पॉलिसी काढताना अटी व शर्ती समजून स्वाक्षऱ्या केल्या होत्या. तो करार शुक्ला व कंपनीला बंधनकारक आहे. शुक्ला यांनी पॉलिसी रद्द करण्यासाठी बँकेकडे चुकीने अर्ज सादर केला. तो अर्ज कंपनीकडे सादर करणे आवश्यक होते. परिणामी बँकेने शुक्ला यांना कोणत्याही प्रकारची दोषपूर्ण सेवा दिली नाही, असे बँकेच्या उत्तरात स्पष्ट करण्यात आले होते.शुक्ला यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार केला नाही. त्यांनी संपूर्ण माहिती घेऊन पॉलिसी काढली होती. त्यांना पॉलिसीचे दस्तऐवज देण्यात आले होते. शुक्ला यांच्या आरोपांत काहीच तथ्य नाही. त्यांनी विमा लवादमध्ये एक वर्षाच्या आत तक्रार दाखल करून वाद सोडवायला हवा होता. परंतु, शुक्ला यांनी तसे केले नाही. सदर तक्रार मंचमध्ये चालविली जाऊ शकत नाही. त्यामुळे तक्रार खारीज करण्यात यावी, असे कंपनीने उत्तरात स्पष्ट केले होते.मंचचे निर्णयातील निष्कर्षउपलब्ध दस्तऐवजावरून शुक्ला यांनी कंपनीकडून पॉलिसी काढली होती, ही बाब सिद्ध होते. तसेच, त्यांनी बँक व कंपनीला विमा पॉलिसी रद्द करण्याबाबत वेळोवेळी कळविले होते. परंतु, कुणीही त्यांच्या विनंतीला प्रतिसाद दिला नाही. शुक्ला यांनी पॉलिसीच्या रकमेत नियमाप्रमाणे रक्कम कपात करून उर्वरित रक्कम परत करावी, असेही म्हटले होते. त्यानंतरदेखील त्यांना योग्य सेवा देण्यात आली नाही. परिणामी, शुक्ला नियमानुसार विमा हप्त्याची रक्कम मिळण्यास पात्र आहेत, असे निष्कर्ष मंचने निर्णयात नोंदवले.

 

टॅग्स :bankबँकnagpurनागपूर