शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकाचे १० हजार ४ टक्के व्याजाने परत करा; ग्राहक मंचचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 10:54 IST

तक्रारकर्त्या ग्राहकाचे १० हजार रुपये ४ टक्के व्याजासह परत करण्यात यावेत, असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने जुना दिघोरी नाका येथील मेसर्स ठाकरे फॅब्रिकेशन अ‍ॅन्ड स्टील वर्कस् यांना दिला आहे.

ठळक मुद्देठाकरे फॅब्रिकेशनला चपराक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तक्रारकर्त्या ग्राहकाचे १० हजार रुपये ४ टक्के व्याजासह परत करण्यात यावेत, असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने जुना दिघोरी नाका येथील मेसर्स ठाकरे फॅब्रिकेशन अ‍ॅन्ड स्टील वर्कस् यांना दिला आहे. व्याज १० आॅगस्ट २०१३ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू होणार आहे.मंचचे अध्यक्ष शेखर मुळे, सदस्य अविनाश प्रभुणे व स्मिता चांदेकर यांनी हा निर्णय दिला. नरेंद्र व्यास असे तक्रारकर्त्या ग्राहकाचे नाव असून, ते मोहननगर येथील रहिवासी आहेत. तक्रारीतील माहितीनुसार, व्यास यांनी ठाकरे फॅब्रिकेशनला फ्लॅटची दारे, खिडक्या व गॅलरीसाठी ५८ रुपये किलो दराने ग्रील तयार करण्याचे काम दिले होते. त्याकरिता १० आॅगस्ट २०१३ रोजी ठाकरे फॅब्रिकेशनला १० हजार रुपये देण्यात आले होते. उर्वरित रक्कम काम पूर्ण झाल्यानंतर द्यायचे ठरले होते. ग्रील एक महिन्यात तयार करून फ्लॅटमध्ये लावून द्यायच्या होत्या. परंतु, ठाकरे फॅब्रिकेशनने निर्धारित वेळेत काम पूर्ण केले नाही. दरम्यान, २५ नोव्हेंबर २०१३ रोजी व्यास यांच्या घरी ७ लाख २० हजार रुपयाची चोरी झाली. त्यासंदर्भात पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर व्यास यांनी घर बदलले व ठाकरे फॅब्रिकेशनला १० हजार रुपये २ टक्के मासिक व्याजासह परत मागितले. ठाकरे फॅब्रिकेशनने त्यांची मागणी मान्य केली नाही. परिणामी, त्यांनी ग्राहक मंचमध्ये तक्रार दाखल केली व ठाकरे फॅब्रिकेशनकडून चोरीच्या रकमेसह एकूण ९ लाख १५ हजार ९८० रुपये मिळण्याची मागणी केली. मंचने विविध बाबी लक्षात घेता वरील आदेश दिला.

टॅग्स :consumerग्राहक