शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

सेवानिवृत्त पोलिसांनाही मिळणार पॉलिक्लिनिकचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:28 IST

शहर पोलीस मुख्यालयात नवनिर्मित अत्याधुनिक व सुविधायुक्त पॉलिक्लिनीकमध्ये सेवानिवृत्त पोलीस कर्मचाºयांना सुद्धा उपचाराचा लाभ मिळेल. यासोबतच पोलीस कर्मचाºयांचा आहार भत्ता वाढवून दिला जाईल,....

ठळक मुद्देडीजी सतीश माथूर : पोलीस मुख्यालयातील पॉलिक्लिनिकचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर पोलीस मुख्यालयात नवनिर्मित अत्याधुनिक व सुविधायुक्त पॉलिक्लिनीकमध्ये सेवानिवृत्त पोलीस कर्मचाºयांना सुद्धा उपचाराचा लाभ मिळेल. यासोबतच पोलीस कर्मचाºयांचा आहार भत्ता वाढवून दिला जाईल, अशी घोषणा राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी येथे केली.काटोल रोडवरील पोलीस मुख्यालयातील नवनिर्मित पॉलिक्लिनिकचे उद्घाटन शनिवारी माथूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी त्यांना योग्य उपचारासाठी अत्याधुनिक रुग्णालयाची गरज होती. नागपूर शहर पोलीस विभागाने ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. नागपुरात चांगल्या सुविधा उपलब्ध असतानाही अधिकारी बदलीसाठी अर्ज करतात. येत्या काही दिवसात जे पोलीस सेवानिवृत्त होतील किंवा अनेक वर्षांनंतर पोलीस सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी अधिकाºयांना सुद्धा या अत्याधुनिक रुग्णालयाचा लाभ मिळायला हवा. पोलीस मुख्यालयात १९७२ मध्ये साकारण्यात आलेल्या पोलीस रुग्णालयाचे अत्याधुनिक पॉलिक्लिनिकमध्ये रुपांतर होणे ही अत्यंत महत्त्वपूर्ण घटना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेले इंडियन आॅईलचे कार्यकारी संचालक मुरली श्रीवास यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेमुळेच नागरिक सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले. त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठीच पॉलिक्लिनिकच्या आधुनिकीकरणासाठी मदत केली.पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे,डीसीपी संभाजी कदम, स्मार्तना पाटील, राकेश कलासागर, सुहास बोवचे, एस. चैतन्य, एसीपी सोमनाथ वाघचौरे, रिना जनबंधू आदींसह अनेक अधिकारी उपस्थित होते.असोसिएशनने मानले आभारशहर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी सेवानिवृत्त पोलीस कर्मचाºयांना या क्लिनिकचा लाभ मिळण्याचे समर्थन केले. यावर डीजी माथूर यांनी सहमती दर्शवित याची घोषणा केली. याबाबत महाराष्ट्र सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कल्याणकारी असोसिएशनचे नागपूरचे अध्यक्ष रमेश मेहता, सचिव सुरेश महाले यांंच्यासह कार्यकारी सदस्यांनी निर्णयाचे स्वागत करीत डीजी व पोलीस आयुक्तांबद्दल आभार व्यक्त केले.