शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

निवृत्त जीएसटी सहायक आयुक्तांचे शिस्तभंगाच्या कारवाईला आव्हान; हायकोर्टाची केंद्राला नोटीस

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: December 13, 2022 15:27 IST

चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश

नागपूर : जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही म्हणून प्रस्तावित शिस्तभंगाच्या कारवाईला निवृत्त केंद्रीय जीएसटी सहायक आयुक्त चंद्रशेखर डेकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करता येत नाही, असा दावा त्यांनी केला आहे. न्यायालयानेकेंद्र सरकार व केंद्रीय जीएसटी विभागाला नोटीस बजावून यावर चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व अनिल पानसरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. डेकाटे सावनेर येथील रहिवासी आहेत. त्यांना १५ ऑक्टोबर १९७७ रोजी उप-विभागीय अधिकाऱ्यांनी हलबा-अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र जारी केले. त्या आधारावर त्यांना १५ जुलै १९८२ रोजी अनुसूचित जमातीकरिता आरक्षित निरीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली. नियुक्ती आदेशामध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट नव्हती.

दरम्यान, त्यांना २००१ मध्ये अधीक्षक, तर २३ फेब्रुवारी २०१७ रोजी सहायक आयुक्तपदी बढती देण्यात आली. पुढे ३० एप्रिल २०१८ रोजी ते सेवानिवृत्त झाले व त्यांना ११ मे २०१८ रोजी सर्व निवृत्ती लाभही अदा करण्यात आले. त्यानंतर त्यांना वेळोवेळी पत्रे पाठवून जात वैधता प्रमाणपत्र मागण्यात आले. तसेच, २९ एप्रिल २०२२ रोजी शिस्तभंगाच्या कारवाईचा आदेश जारी करण्यात आला.

कारवाई रद्द करण्याची मागणी

केंद्र सरकारद्वारे नियुक्त अभ्यास मंडळाच्या अहवालानुसार, १९९५ पूर्वी जारी झालेल्या जात प्रमाणपत्राची वैधता तपासण्याची गरज नाही. तसेच, सर्वोच्च व उच्च न्यायालयाने विविध प्रकरणांमध्ये वेळोवेळी दिलेल्या निर्णयांनुसार, कर्मचाऱ्याला अदा केलेले निवृत्ती लाभ परत घेता येत नाही. परिणामी, वादग्रस्त कारवाई अवैध ठरवून रद्द करण्यात यावी, अशी मागणी डेकाटे यांनी न्यायालयाला केली आहे. डेकाटेंच्या वतीने ॲड. शैलेश नारनवरे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयMumbai High Court Nagpur Benchमुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठCentral Governmentकेंद्र सरकार