शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

गारपीटग्रस्तांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन होणार

By admin | Updated: June 18, 2014 01:25 IST

ज्या शेतकऱ्यांचे गारपीटीमुळे नुकसान झाले आणि ज्यांना शासनाच्या पॅकेजचा लाभ मिळाला अशा शेतकऱ्यांनी २०१३-१४ मध्ये घेतलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश सहकार सचिवांनी दिले आहेत.

शासनाचा निर्णय : बँकांकडून मात्र शेतकऱ्यांची बोळवणहर्षल तोटे - पवनारज्या शेतकऱ्यांचे गारपीटीमुळे नुकसान झाले आणि ज्यांना शासनाच्या पॅकेजचा लाभ मिळाला अशा शेतकऱ्यांनी २०१३-१४ मध्ये घेतलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश सहकार सचिवांनी दिले आहेत. या शेतकऱ्यांना थकीत कर्ज २०१४-१५, १५-१६ व १६-१७ अशा वार्षिक तीन हप्त्यात भरण्याची मुभा दिली आहे. सोबतच गारपीटग्रस्त थकीत शेतकऱ्यांना २०१४-१५ करिता कर्ज देण्याच्या सूचनासुद्धा बँकांना दिल्या आहेत. सदर योजना फेब्रुवारी-मार्च २०१४ मध्ये झालेला अवेळी पाऊस व गारपिटीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या शेती व फळ पिकांसाठी घेतलेल्या पीक कर्जास लागू राहणार आहे. २०१३-१४ या हंगामातील पीक कर्जाचे उपर्जित व्याज शासनामार्फत संबंधीत बँकांना अदा करण्यात येणार आहे. पुनर्गठनाचा लाभ घेणारे शेतकरी २०१४-१५ या हंगामात पीक कर्ज घेण्यास पात्र ठरतील; परंतु शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी राष्ट्रीयकृत बँकांकडून होताना दिसत नाही. किंबहुना शासनाची ही माहिती बँकांनी दडवून ठेवली असून याबाबत शेतकरी अनभिज्ञ आहेत.आधी जुने कर्ज फेडा व मगच नवीन कर्जाबाबत मागणी करा अशी बँकांच्यावतीने तंबी देण्यात येत आहे. याबाबत कृषी विभाग सुद्धा अनभिज्ञ आहे. विभागातर्फे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे आवश्यक होते; शासन घोषणा करते, परिपत्रकही काढते; परंतु त्याची अंमलबजावणी होते किंवा नाही याचा आढावा घेताना दिसत नाही. खरीपाचा हंगाम सुरू झालेला असून येत्या आठ-दहा दिवसात शेतकऱ्यांच्या हाती पैसा आला नाही तर खरीपाचा हंगाम वाया गेल्याशिवाय राहणार नाही.